• Mon. Nov 25th, 2024

    अजित पवारांना आता बारामतीतच विरोध, माळेगावच्या गळीत हंगाम कार्यक्रमावर आंदोलनाचे सावट, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

    अजित पवारांना आता बारामतीतच विरोध, माळेगावच्या गळीत हंगाम कार्यक्रमावर आंदोलनाचे सावट, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

    पुणे : बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी(दि २८) रोजी होणार आहे. यासाठी कारखान्याने कार्यक्रमाची जंगी तयारी ही केली आहे. मात्र या कार्यक्रमावर आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचे सावट पसरल्याचे दिसून येत आहे.

    याबाबत मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीने माळेगांव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय व्यक्तींना महाराष्ट्रात गाव बंदी केलेली आहे. तशी प्रसिध्दी राज्यभर दिलेली आहे. त्यानंतर देखील कारखान्याचा गळीत हंगाम उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय व्यक्तींना गाव बंदी आहे. त्यामुळे या वर्षीचा गळीत हंगाम कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते करू नये,अशी विनंती अध्यक्ष जगताप यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    Pune News:पिझ्झा डिलिव्हरीला उशीर, संतापलेल्या ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण; हवेत गोळ्या झाडल्या, आरोपी अटकेत
    राजकीय व्यक्तींच्या हस्ते गळीत हंगाम सुरू करण्याचा घाट घातल्यास कारखान्यावर बहुसंख्येने जमुन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहिल,असा ही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

    बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ काल मंगळवार रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडला. त्यानंतर आयोजित सभेत मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप परत घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना सभास्थळापासून बाहेर नेले. त्यानंतर शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे निश्चित असतानाच या कार्यक्रमावर आंदोलनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.

    बारामतीत अजित पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांनी समजूत काढत बाहेर काढलं!

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *