या रथोत्सवाच्या मिरवणुकीत शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीनिमित्त दरवर्षी ११ दिवस भगवान बालाजीचे वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून काढण्यात येते. यात मोर, सिंह, हत्ती, गरूड, शेषनाथ, विमान, सूर्य, चंद्रमा, मारूती, सप्तमुखी घोडा यावाहनांचा समावेश आहे. वहन मिरवणुकीची सांगता दसऱ्याच्या दिवशी झाल्यानंतर पाशांकुश एकादशीला बालाजी रथाची मिरवणूक काढण्यात येते. त्यासाठी रथ बाहेर काढून स्वच्छ धुवून त्याची सजावट केली गेली. मिरवणुकीचा मार्ग गट नंबर चार, बालाजी मंदिरमार्गे, खोलगल्ली, प्रभाकर चित्रमंदिर, आग्रा रोड, फुलवाला चौक, गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली नंबर सहामार्गे खोलगल्ली बालाजी मंदिराजवळ मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पुजाविधी करून मिरवणुकीचा समारोप होणार आहे.
धुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही या मिरवणूकीत मोठया संख्यने सहभागी होतात. भाविकांची संख्या जास्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ठराविक अंतरावर विश्रांतीसाठी थांबविण्यात येतो. रथावर नियंत्रण मिळविण्यासाठी अथवा रथ थांबविण्यासाठी लाकडाच्या मोगरी लावण्याचे काम शहरातील बाजार समितीमधील हमाल व मापारी संघटनेकडे अनेक वर्षांपासून जबाबदारी आहे.
हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे. तो २५ फूट उंच आहे. मिरवणुकीदरम्यान रथ विविध रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात येतो. हा रथ तीन फुट उंचीच्या साखळीने व वीस फूट लांब जाड दोराच्या सहाय्याने ओढला जातो. रथावर श्री बालाजी भगवान यांची पंचधातूची मूर्ती बसविण्यात आली आहे. रथावर सोळा पुजारी पूजा-अर्चा करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News