• Sat. Sep 21st, 2024

ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गाचा खर्च वाढला, प्रकल्पासाठी ७७६५ कोटी मंजूर

ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गाचा खर्च वाढला, प्रकल्पासाठी ७७६५ कोटी मंजूर

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधल्या जाणाऱ्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पखर्चाची मूळ अंदाजित किंमत ५२६० कोटी रुपये होती. २०२३-२४च्या अर्थसंकल्पात यासाठी ६५७२.१९ कोटी रुपये मंजूर झाले. आता या प्रकल्पासाठी वाढीव खर्च येणार असून यासाठी ७७६५.०९ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली.

हा मार्ग ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह यादरम्यान ९.२३ किमी लांबीचा आहे. त्यामध्ये ६.५१ किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगद्याच्या बांधकामाचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बोगद्यांच्या आतील बाजूस काँक्रीट अस्तरीकरण करणे, क्रॉस पॅसेजची रचना आदीचा अंर्तभाव आहे. या कामात दोन स्वतंत्र बोगदे असून प्रत्येक बोगद्याच्या आतील बाजूचा व्यास ११ मीटर असेल. पूर्व मुक्त मार्ग ऑरेंज गेट येथे वाहनांना उतरण्यासाठी पूल व भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना पोहोचमार्ग यांचाही समावेश असेल. याखेरीज अनेक काही वैशिष्ट्यांचा या प्रकल्पात समावेश आहे. मात्र या संपूर्ण मार्गाच्या खर्चात मोठे बदल झाले आहेत.

एका रात्रीत झाला कोट्यधीश; जुन्या सामानात मिळालं ६० वर्षांपूर्वीचं पासबुक अन् मग…
या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने काढलेल्या निविदेला जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स-नागार्जुन कन्स्ट्रक्शन्स यांच्या संयुक्त कंपनीसह लार्सन अॅण्ड टुब्रो, या कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यामध्ये लार्सन अॅण्ड टुब्रोची ७७६५.०९ कोटी रुपयांची बोली सर्वांत कमी होती. ती एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीने मंजूर केली आहे. मात्र प्रत्यक्षात या कामासाठी एमएमआरडीएने फक्त ५२६० कोटी रुपयांचा खर्च अंदाजित केला होता. खर्चवाढ गृहित धरून अर्थसंकल्पात ६५७२.१९ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला, परंतु आता त्याहून ११९२ कोटी रुपये अधिक असलेली निविदा मंजूर करीत लार्सन अॅण्ड टुब्रोला हे कंत्राट देण्याचे याच बैठकीत निश्चित झाले आहे.

खर्चवाढीची संभाव्य कारणे

– काही ठिकाणी मृदू स्वरूपाच्या मातीचा थर अपेक्षित असून अशा ठिकाणी भूवैज्ञानिकांमार्फत सखोल तपासणी आवश्यक

– पूर्व मुक्तमार्गावरून येणारी वाहतूक गिरगाव चौपाटी/मरीन ड्राइव्ह या ठिकाणी येऊन मिळणार असल्याने येथील नियोजनाचा सखोल अभ्यास आवश्यक

– अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून रस्त्याच्या प्रकल्पाची आखणी असल्याने अस्तित्वातील रस्ते/पूल यांच्याशी सुयाग्य जोडण्याचा अभ्यास आवश्यक

रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला, ठाकरेंच्या वर्मी घाव घालणारं शिंदेंचं भाषण

साडे सात कोटी खर्चून होणार अभ्यास

अशा प्रकारे प्रकल्पात खर्चवाढ झाल्याने, ही खर्चवाढ नेमकी का व कशी, याबाबत शोध घेण्यासाठी या प्रकल्पाच्या पुनर्विलोकनाचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी ७.५३ कोटी रुपयांच्या खर्चासदेखील प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने मंजुरी दिली. टाटा कन्सलटन्सी लिमिटेड या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

सेल्फीचा नाद जीवावर बेतला, कारसह कुटुंब पुलावरुन खाली कोसळलं, ५ जणांचा मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed