• Sat. Sep 21st, 2024

सोने खरेदीसाठी सुवर्णनगरीत मोठी गर्दी; बाजारपेठा सजल्या, मात्र दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले

सोने खरेदीसाठी सुवर्णनगरीत मोठी गर्दी; बाजारपेठा सजल्या, मात्र दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले

जळगाव: साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा समाज हा सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर घरात कायम बरकत राहते अशी नागरिकांची भावना असल्यामुळे आजचा दसरा सणाचा मुहूर्त साधण्याकरता देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सकाळपासूनच सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
आझाद मैदानावरील दसरा मेळाव्याला पहाटे निघालेले, दुधाच्या टँकरची धडक अन् शिवसैनिकाचा मृत्यू, चार जण जखमी
५७ हजार रुपयांपर्यंत सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसानंतर सोन्याच्या दरात तब्बल चार रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचे भाव हे ६१ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. मात्र आज दसरा सण आहे. दसरा सणाला सोने खरेदीचा विशेष महत्त्व असल्यामुळे आज थोडं फार कमी खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासूनच सराफ बाजारातील दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सोन व्यवसायिकांकडूनही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बारामतीत अजित पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांनी समजूत काढत बाहेर काढलं!

यात ग्राहकांचे विशेष आकर्षण असलेला सोन्याचे आपट्याचे पान हे सुद्धा प्रत्येक वजनामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. भावावर झाली असली तरी मात्र सकाळपासूनच आज दसरा सण असल्यामुळे ग्राहकांचा ओघ पाहायला मिळत असून दिवसभर ग्राहकांच्या गर्दीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात जरी वाढ झाली असली तरी मात्र आजचा सोने खरेदीचा जो मुहूर्त आहे. तो मुहूर्त साधण्याकरता थोडे फार का होईना सोने खरेदीसाठी दुकानात आलो आहोत, अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी बोलताना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed