बुलढाणा: जिल्ह्यातील राजूर घाट गुन्हेगारीचा घाट होत चालला आहे. अनेकदा राजूरघाटात चित्तथरारक प्रसंग घडून गेले आहेत. कथिक सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर घाटातील देवी मंदिराच्या परिसरात पोलीस चौकी लावण्यात आली आहे. या ठिकाणच्या पोलीस बंदोबस्तामुळे काल २३ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एकाचा कट रोखला गेला.
या घटनेतील आरोपी तसेच फिर्यादी मूळ अकोला जिल्ह्यातील असून आरोपीने पत्नीला संपवण्याचा कट बुलढाण्याच्या राजुर घाटात रचला होता. या संदर्भात रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीस ताब्यात सुध्दा घेण्यात आले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शेख इब्राहिम शेख चांद यानी संशयातून पत्नीस फारकत देण्याचे ठरविले. काल २३ ऑक्टोबरच्या दुपारी कागदपत्र आणायचे सांगून पत्नीला बुलढाण्याच्या राजूर घाटात आणले.

त्यानंतर ओढणीने गळा आवळला. यानंतर पत्नी ओरडल्याने परिसरात आवाज झाला. यावेळी पोलीस चौकीत असलेले होमगार्ड सोमनाथ वानरे, शुभम शेळके यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या प्रसंगावधान तेने मोठा अनर्थ टळला. प्रकरणातील आरोपी वर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.