• Mon. Nov 25th, 2024
    आईची भेट ठरली शेवटची, कांदिवलीच्या आगीत माजी IPL क्रिकेटपटूने गमावले दोन जीवलग

    मुंबई : कांदिवली पश्चिमेला एका आठ मजली इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत माजी आयपीएल क्रिकेटपटू पॉल वल्थाती याची बहीण आणि आठ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले आहेत. ग्लोरी वल्थाती (वय ४३) आणि जोसू रॉबर्ट (८) अशी मयत मायलेकाची नावं आहेत.

    या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी राजेश्वरी भर्ताडे ही २४ वर्षीय तरुणी १०० टक्के भाजली आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

    गोरेगाव येथे एका एसआरए इमारतीला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच, कांदिवली पश्चिमेतील साईबाबानगर येथील वीणा संतूर या सोसायटीस सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास आग लागली. या इमारतीत प्रत्येक मजल्यावर चार घरे आहेत. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरात आग लागली. त्यावेळी घरात ९० वर्षीय वृद्धा होत्या. त्यांची सून लहान मुलीला शाळेतून घेऊन येत होती. त्या घरात पोहोचताच त्यांनी व्हीलचेअरवरील या आजींना घराबाहेर नेले.

    ही आग एवढी भीषण होती की, त्यामुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट निर्माण झाले. पहिल्या मजल्यावरील रहिवासी सुखरूप बाहेर पडले, मात्र वरच्या मजल्यावरील रहिवासी अडकून पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

    पाच कुटुंबीयांवर विषप्रयोग, संघमित्रा पतीला संपवताना कचरत होती, मामीला आणखी ११ जणांचा काटा काढायचा होता
    दरम्यान, दुसऱ्या मजल्यापासूनचे सर्व रहिवासी हे जीव वाचवण्यासाठी शेवटच्या मजल्यावर गेले. चौथ्या मजल्यावरील काही रहिवासी घरातच थांबले. चौथ्या मजल्यावरील ४२१ क्रमांकाच्या सदनिकेत राहणाऱ्या ग्लोरी वल्थाती आणि जोसू रॉबर्ट, तसेच राजेश्वरी भर्ताडे (२४) आणि लक्ष्मी भुरा (४०) या त्यांच्या मोलकरणी जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र प्रचंड धुरामुळे त्यांना समोरचे काहीच दिसत नव्हते.

    ‘वाघ बकरी चहा’ फेम पराग देसाईंचे निधन, भटक्या कुत्र्यांपासून वाचताना पडल्याने ब्रेन हॅमरेज
    इमारतीच्या वर किंवा खाली जाण्यासाठी त्यांच्याकडून बरेच प्रयत्न सुरू होते. मात्र काहीच दिसत नसल्याने ते मागे फिरले. इमारतीच्या खाली जाऊन पुन्हा वर येण्याच्या प्रयत्नात राजेश्वरी या पूर्णपणे भाजल्या. तर लक्ष्मी यांचे हात भाजले. तरीही त्या पुन्हा चौथ्या मजल्यापर्यंत घरी आल्या. त्याचवेळी ग्लोरी आणि जोसू हे घरात येण्यासाठी प्रयत्न करत असतानाच त्यांना प्रचंड धुराचा त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे ते घराबाहेरील जिन्यातच कोसळले.

    दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे अपघाती निधन, गाडीचे चाक डोक्यावरुन गेल्याने गतप्राण
    सुमारे तासाभराने आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन जवानांनी इमारतीत प्रवेश केला आणि यातील जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील ग्लोरी वल्थाती आणि जोसू यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. तर राजेश्वरी भर्ताडे या १०० टक्के व लक्ष्मी भुरा या ४५ ते ५० टक्के भाजल्या आहेत. याशिवाय रंजन शहा या ७६ वर्षीय महिला ४५ ते ५० टक्के भाजल्याची माहिती देण्यात आली. या इमारतीतील अग्निशमन यंत्रणा बंद होती का, त्याचे फायर ऑडिट झाले का याची तपासणी अग्निशमन दलाकडून केली जाणार आहे.

    मुख्यमंत्री येणार म्हणून रस्त्यावरचे खड्डे बुजवले; गोरेगावातील दुर्घटनाग्रस्तांचा संताप

    भारतभेट ठरली शेवटची

    या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली ग्लोरी ही काही दिवसांपूर्वी जोसूसह इंग्लंडहून मुंबईत आली होती. आजारी आईला पाहण्याची आणि मुंबईत आपल्या कुटुंबासोबत नवरात्र आणि दिवाळी साजरी करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ग्लोरी या मुंबईचा माजी खेळाडू पॉल वल्थाती यांच्या भगिनी आहेत. ग्लोरी यांचे पती इंग्लंडमध्ये राहतात.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed