• Mon. Nov 25th, 2024
    संत्र्याची वाहतूक सुरु होती, पोलिसांना संशय आला, ट्रक थांबवून तपासणी करताच ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, काय घडलं?

    नागपूर: गांजा तसेच अंमली पदार्थ्यांच्या तस्करीसाठी विविध प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात. अशीच युक्ती वापरून संत्राच्या मालात तब्बल ३९ लाख ९७ हजार ४८० रुपये किमतीचा १९९ किलो गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचला यश आले आहे. पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून जवळपास दोनशे किलो गांजासह इतर असा तब्बल ५६ लाखांवरील मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.
    घरातील व्यक्ती कामाला; तरुण घरी एकटाच, आयुष्याला कंटाळला, नको ते करुन बसला अन्…
    पोलिसांना माहिती मिळाली की, भंडारा मार्ग येथून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर गांजा जाणार आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रविवारी दुपारी सापळा रचला. त्यानुसार कापली पुलाजवळ एमएच १३ एएक्स ४८६६ क्रमांकाच्या ट्रकला रोखले. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यात वरच्या भागात संत्र्याचा माल दिसून आला. मात्र, व्यवस्थित तपासणी केल्यावर संत्र्याच्या कॅरेटच्या खाली ९ प्लास्टिकचे पोते आढळले. त्यात सुमारे ३९ लाख ९७ हजार ४८० रुपये किमतीचा १९९ किलो ८७४ ग्रॅम गांजा होता. पोलिसांनी या प्रकरणी शेख अल्ताफ शेख सलीम (३६) रा. मोठा ताजबाग, प्रमोद दिलीप कळने (३०) रा टिपू सुलतान चौक, यशोधरानगर आणि अक्षय विनोद शेंडे (२४) रा. यादव नगर, यशोधरानगर यांना ताब्यात घेतले.

    इतके दिवस नव्हता, उशिरा बोललात अन् फूट पाडता? मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल

    पोलिसांनी आरोपींकडून ३ मोबाईल आणि प्लास्टिक कॅरेड आणि ट्रक असा एकूण ५६ लाख १६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीनही आरोपींविरोधात पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल शिरे, विक्रांत थारकर, पंकज भोपळे, रोठे, कोहळे, राजेश लोही, प्रमोद वाघ, टप्पुलाल चुटे, निखील जामगडे, राजेंद्र टाकळीकर, विशाल नागभिडे, सुधीर तिवारी, अमोल भक्ते यांच्या पथकाने केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed