• Sat. Sep 21st, 2024

मराठा आरक्षण मिळत नसल्याने संयम सुटला, दहावीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं

मराठा आरक्षण मिळत नसल्याने संयम सुटला, दहावीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं

नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात आत्महत्येच सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री एका २४ वर्षीय तरुणाने आरक्षणासाठी कीटकनाशक औषध प्राशन करुण जीवन संपवले होते. पण त्याच्या चितेची आग थंड होण्यापूर्वीच रविवारी नायगाव तालूक्यात दहावी वर्गात शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहले आहे. दरम्यान आरक्षणासाठी जिल्ह्यात २४ तासात दोघांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.

ओमकार आनंद बावणे ( वय १७ रा. भोपळा ता. नायगाव ) असं विद्यार्थ्यांच नाव आहे. ओमकार याच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. आई वडील मोलमजुरी करतात. रविवारी सायंकाळी ओमकार हा गावातील विहरीवर गेला. यावेळी त्याने लिहलेली चिठ्ठी विहरी जवळ ठेवली आणि त्यांनतर त्याने विहरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. रामतीर्थ पोलिसांनी पंचनामा करुण मृतदेह शव विच्छेदनासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे.

आरक्षणासाठी जीव देतोय, माझं बलिदान वाया जाऊन देऊ नका! नांदेडमध्ये मराठा तरुणानं आयुष्य संपवलं

दरम्यान हदगाव तालुक्यातील वडगाव येथील शुभम पवार या २४ वर्षीय तरुणाने देखील आत्महत्या केली. अर्धापूर तामसा बायपास रोड वरील एका मंगल कार्यालया जवळील झाडीत तो मृत अवस्थेत आढळून आला होता. या घटनेला २४ तास उलटण्या पूर्वीच ओमकार बावणे या विद्यार्थ्याने देखील आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी आता पर्यंत ५३ जणांनी बलिदान दिले आहे. त्यात मागील २४ तासात नांदेडच्या दोघांनी आत्महत्या केली आहे. आरक्षणासाठी सरकार आणखी किती बळी घेणार असा सवाल सकल मराठा समाजाकडून विचारला जातं आहे.

धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार? जाहिरात चर्चेत

चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहलं होतं?

मी ओमकार आनंद बावणे, माझी परिस्थिती खराब आहे. माझे आई-वडील मजुरी करुण आम्हाला शिकवण शिकवत आहेत. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती, शिक्षणसाठी पूर्ण पैसे पण नाही. मराठा समाजाला आरक्षणही मिळत नाही, असे त्याने चिठ्ठीत लिहले आहे. दरम्यान मराठा आरक्षणसाठी जिल्ह्यात आत्महत्येच सत्र सुरूच असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

एका आठवड्यात २ मराठा तरुणांच्या आत्महत्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली अस्वस्थता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed