• Sat. Sep 21st, 2024

बस डेपो आणि पार्किंगसाठी पीएमआरडीएकडे जागेची मागणी, ग्रीन सिग्नल मिळाल्यास PMP ला लाखोंचा फायदा

बस डेपो आणि पार्किंगसाठी पीएमआरडीएकडे जागेची मागणी, ग्रीन सिग्नल मिळाल्यास PMP ला लाखोंचा फायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) डेपो व बस पार्किंगसाठी आवश्यक असलेल्या आणि सध्या वापरात असलेल्या तीन जागा देण्याची मागणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) केली आहे. या जागा मिळाल्यास पीएमपीकडून लाखांमध्ये दिले जाणार भाडे वाचणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडी) हद्दीत पीएमपीकडून सार्वजनिक सेवा दिली जाते. पीएमपीकडून पीएमआरडीए हद्दीत ११३ मार्गावर ४९० बसमार्फत सेवा दिली जाते. या सेवेच्या बदल्यात पीएमआरडीएने गेल्या वर्षी १०० कोटी रूपये दिले आहेत. पीएमपीकडून पीएमआरडीएच्या काही जांगाचा पार्कींग, डेपोसाठी वापर केला जात आहे. पण, बदल्यात पीएमपीला लाखो रूपयांचे भाडे पीएमआरडीएला द्यावे लागत आहे. त्यामुळे पीएमपीने मोशी, भोसरी आणि रावेत येथील जागा देण्याची मागणी पीएमआरडीएकडे केली आहे. या जागा पीएमपीला मिळाल्यास महिन्याला लाखो रूपये वाचणार आहेत. या मागण्यांवर पीएमआरडीएकडून विचार सुरू आहे.

Pune PMPML: पुणेकरांना आठवला संतोष माने: वर्दळीच्या चौकात काळजाचा ठोका चुकवणारा Video; काय घडलं?
नऊ जागांच्या मागणीचा प्रस्ताव पडूनच

पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीची सेवा मोठ्या प्रमाणात दिली जाते. अनेक नागरिक पीएमआरडीएच्या हद्दीत राहून नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात येतात. त्यामुळे पीएमपीच्या ४९० बस पीएमआरडीएच्या हद्दीत चालतात. भविष्यात पीएमआरडीच्या हद्दीत डेपो उभारणी करण्यात येणार आहेत. त्यासाठी नऊ ठिकाणी जागा देण्याची मागणी पीएमपीने केली आहे. एक जागा किमान पाच एकरपर्यंत असावी म्हणजे त्या ठिकाणाहून डेपो सुरू करणे शक्य होईल, असे म्हटले होते. पण, या नऊ जागांच्या मागणीचा प्रस्ताव अद्याप तरी पडून आहे. त्यावर मुख्यमंत्र्याच्या पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

चालकाने दारू पिऊन चालवली बस; पुण्यातील रस्त्यावर खळबळ

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed