• Mon. Nov 25th, 2024

    अशोक चव्हाण यांचं शरद पवार प्रकाश आंबेडकर भेटीवर मोठं वक्तव्य, म्हणाले जे काही असेल ते…

    अशोक चव्हाण यांचं शरद पवार प्रकाश आंबेडकर भेटीवर मोठं वक्तव्य, म्हणाले जे काही असेल ते…

    मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीनंतर ही कॉफीसाठी भेट झाल्याचं म्हटलं. मविआतील समावेशाबद्दल चर्चा झाली नाही, असं ते म्हणाले. या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसकडून या भेटीचं स्वागत करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही भेट स्वागतार्ह असून महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने एक शुभसंकेत असल्याचं म्हटलं.

    अशोक चव्हाण काय म्हणाले?

    आज मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर व शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

    तरुण पत्नीकडे पाहत असल्याचा संशय, हातात सुरा घेत पोलिसाने माजवली दहशत, पोलीस दाम्पत्य निलंबित
    अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, माझी व्यक्तिगत इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले पाहिजे. आज भलेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा आंबेडकरांच्या भाषेमध्ये कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे संकेत त्यांनी दिले; जे काही असेल ते सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये यातून एक संवाद सुरू होईल. पुढील काळात वंचित आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याच्या दृष्टीने काही चांगली सकारात्मक पावले पडावीत, अशी माझी इच्छा आहे, अशोक चव्हाण म्हणाले.
    मोठी बातमी, शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने संपवलं आयुष्य, कारण अस्पष्ट

    प्रकाश आंबेडकर शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले?

    सुप्रिया सुळे यांनी विनंती केल्यानंतर आम्ही कॉफी पिण्यासाठी बोलावलं होतं. तिथं शरद पवार देखील उपस्थित होते, एकूण १२ जण तिथं उपस्थित होते. आज मविआसंदर्भातील काहीच घडलेलं नाही. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. माझा भाजपला कायम विरोध आहे हे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षात ठेवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

    हार्दिकच्या जागी भारतीय संघात होणार मॅचविनरची एंट्री, मोठ्या सामन्यापूर्वी रोहितची चिंता मिटली

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed