जळगाव: संपूर्ण देशात सुवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक स्तरावरील इस्त्रायल- हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जळगावच्या सुवर्णनगरीवरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. पितृपक्षामध्ये ५७ हजार रुपयांपर्यंत खाली पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा वाढले असून अवघ्या पंधरा दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये चार हजार २०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या सोन्याचे दर ६१ हजार २०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध मागील काही दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे या युद्धाचा परिणाम हा सोन्याच्या बाजारावर सुद्धा झाला आहे. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जात असल्याने इस्रायल-हमास युद्धामुळे इतर ठिकाणची गुंतवणूक ही सोन्यात वळती झाली. इतरही फंड हे सोन्याकडे वळले. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आणि सोन्याचे दर हे ६१ हजार २०० रुपयांपर्यंत पोहचले.

सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी सुवर्णनगरीतील सराफा दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काळात दसरा-दिवाळी सण आहेत, लग्न सराई सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात जरी भाव वाढ झाली असली तरी त्याचा ग्राहकांवर कुठलाही परिणाम झालेला नाही असे सोने व्यावसायिकांनी सांगितले.
भाव वाढल्यामुळे बजेट कोलमडले असले तरी पुन्हा आणखी भाव वाढ होईल या भीतीने नागरिक सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाव वाढ झाल्याने ज्या प्रमाणात खरेदी करायची होती, त्याप्रमाणात खरेदी करताना हात आखडते घ्यावे लागत आहेत आणि ग्राहक बजेटमध्ये सोने खरेदी करत आहेत.सोन्याचे भाव काही प्रमाणात कमी व्हावेत अशी अपेक्षा ही ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News