चंद्रपूर: गौतमी पाटील या नावाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या तरुण वृद्धांना वेड लावले आहे. समाजमाध्यमात गौतमी पाटील हिचे व्हिडिओ तुफान वायरल होत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाळ खुर्द येथे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम बघून परत येताना तीन अपघात झाले. या अपघातात तीन जण ठार, तर चार जखमी असल्याची माहिती आहे.
यासंदर्भात सावली येथील ठाणेदार यांना विचारणा केली असता ठाणेदार पोंभुर्णा येथील आंदोलन स्थळी कार्यरत असल्याच सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबरला चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील व्याहाळ खुर्द येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन्ही जिल्ह्यांतील गौतमीप्रेमींनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघून परत येताना तीन अपघात झाले आहेत. या अपघातात तीन ठार चार गंभीर असल्याची माहिती आहे.

पहिला अपघात मोखाळा येथील कमलाई महाविद्यालया समोर घडला. दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिल्याने यश हरी सहारे (१७), जयेश महाडोळे (२६) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आकाश मोहुर्ले हा युवक जखमी आहे. किसाननगर येथे झालेल्या अपघातात सेजल गंगवाणी ही महिला जखमी आहे. खेडी फाट्याजवळ झालेल्या अपघातात प्रमोद जयपूरकर यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी प्रणाली गंभीर जखमी आहे.