सोयाबीन राससाठी मळणी यंत्र आणले होते
भानुदास बापूराव गरड (वय ५९) यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी भास्कर गरड याच्या शेतात सोयाबीन मळणीसाठी यंत्र आले होते. त्यासाठी नंदा भास्कर गरड आणि त्यांचा मुलगा रामराजे असे तिघेजण स्वतःच्या शेतात गेले असताना मळणी यंत्र चालू केले.
नंदा यांचं डोकं मळणी यंत्रात गेलं
शुक्रवारी सकाळपासून सोयाबीनच्या रासमध्ये संपूर्ण परिवार गडबडीत होता. नंदा गरड या मळणी यंत्र चालू असताना त्या मळणी यंत्राच्या खाली पडलेले सोयाबीन पिकांचे दाणे गोळा करत होत्या. नंदा यांच्या डोक्यावर बांधलेला स्कार्फ आणि त्यांचे केस हे ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र जोडणाऱ्या फिरत्या रॉडला अडकले. त्यांचे डोकंही फिरत्या रॉडमध्ये अडकले. डोक्याला गंभीर जखम झाल्याने नंदा यांचा जागीच मृत्यू झाला.
पांगरी पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले
पांगरी पोलिसात अकस्मात नोंद होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे आणि पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार काशीद हे घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शब्बीर शेख करीत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News