• Mon. Nov 25th, 2024

    पत्राच्या घरात राहणाऱ्या वाघे बाईंनी विठुरायाच्या चरणी अर्पण केले १८ लाख रुपयांचे दागिने

    पत्राच्या घरात राहणाऱ्या वाघे बाईंनी विठुरायाच्या चरणी अर्पण केले १८ लाख रुपयांचे दागिने

    धाराशिव: वास्तव्यासाठी पत्र्याचे जुनाट, जीर्ण घर ना खाली फरशी, ना विजेची व्यवस्था, रात्री केवळ मिणमिणत्या दिव्याचा प्रकाशात राहणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गावातील बाई लिंबा वाघे यांनी श्रद्धेपोटी विविध मंदिरांना ५० लाखांपेक्षाही अधिक दान दिले. नुकतेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाला सोन्याचा कडदोरा आणि रुक्मिणीला गंठण असे १८ लाखांचे दागिने नुकतेच अर्पण केले.

    त्यांनी आतापर्यंत विविध मंदिरांना ५० लाख रुपयांचे दागिने दान केले. बाई लिंबा वाघेला याचे वय ८५ वर्षे आहे. त्या एकट्याच वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पतीचे ५० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. त्यांना अपत्य नाही. त्यांना वाटणीची ११ एकर शेती आली. नुकतेच बाई वाघे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देवाला सोन्याचा २६ तोळ्याचा करदोडा आणि रुक्मिणीला सोन्याचे गंठण अर्पण केले आहे. याची बाजारातील किंमत १८ लाख रुपये आहे. याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

    दुर्गा देवीच्या या मंदिरात ८०० वर्षांपासून महिलांना नो एन्ट्री, कारणही आश्चर्यचकित करणारं
    बाई वाघे यांनी यापूर्वी रुईभर (धाराशिव) येथील श्री दत्तमंदिरात कळसासाठी एक तोळे सोने आणि एक किलो चांदी अर्पण केली. पळसवाडीतील मारुती मंदिरासाठी सात लाख रुपयांच्या मूर्ती, शिवाजीनगर (धाराशिव) येथील खंडोबा मंदिरात दोन लाख रुपयांच्या मूर्ती, अक्कलकोटच्या मंदिराच्या अन्नछत्रात भांडी दिली. बेंबळीतील खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धारही केला. विशेष म्हणजे त्यांनी पंढरपूरला दान देण्यासाठी सहा एकर शेती विकली आहे.

    भाविकांच्या बसला अपघात, पाच वर्षानंतर पुन्हा तेच घडलं, नाशकातील दुर्दैवी घटनेने सारे गहिवरले
    आपल्या घरातील वीजेची जोडणीही बाई वाघे यांनी तोडून टाकली आहे. रात्रीचा वेळ केवळ मिणमिणत्या दिव्याच्या सानिध्यात जातो. घरात पाण्यासाठी घागर, धान्य ठेवण्यासाठी जुन्या पद्धतीची खापराची भांडी, दोन तीन साड्या असेच साहित्य सोबत असते. वार्धक्य आलेले असतानाही स्वयंपाक आणि अन्य कामे स्वतःच करतात.

    पारंपरिक पोशाख आणि अलंकारात सजणार विठुमाऊली, शारदीय नवरात्री उत्सवाची मंदिरात तयारी!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed