• Sat. Sep 21st, 2024

आरोपीला पेशीसाठी कोर्टात आणलं; पुन्हा जेलमध्ये गेल्यावर घडलं असं काही की सगळेच चक्रावले

आरोपीला पेशीसाठी कोर्टात आणलं; पुन्हा जेलमध्ये गेल्यावर घडलं असं काही की सगळेच चक्रावले

पुणे: एकीकडे ललित पाटील प्रकरण पुण्यात सह राज्यातील पोलीस प्रशासन तणावात आहे. दरम्यान मंगळवारी येरवडा जेलमधून कोर्टात नेलेल्या आरोपीला दुपारी परत जेलमध्ये हजर केल्यानंतर त्याच्याकडे २५ ग्रॅम चरस आढळून आला. त्यामुळे पुन्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
क्लिनर ट्रकखाली झोपला; चालक स्टेअरिंगवर बसला, गाडी सुरू केली, नंतर जे घडलं त्यानं…
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम उर्फ बारक्या हरीश्चंद्र पास्ते असे या आरोपीचे नाव आहे. पास्ते हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून ऑक्टोंबर २०१७ पासून तो येरवडा जेल येथे शिक्षा भोगत आहे. मंगळवारी पुणे पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला शिवाजीनगर मोक्का कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्ट पेशीवरून पोलीस पथकाच्या बंदोबस्तात दुपारी २ वाजून १० मिनिटांनी त्याला परत कारागृहात हजर करण्यात आले. त्यावेळी मुख्य प्रवेशव्दाराजवळच कारागृह शिपायाने त्याची झडती घेतली.

पवारांचा जुना शिलेदार परतणार, शिंदेंना धक्का तर अजित पवारांचं टेन्शन वाढणार

त्यावेळी पास्ते याने गुदद्वारामध्ये चरससदृश्य वस्तू लपवून आणल्याचे आढळून आले. कारागृह पोलिसांनी २५ ग्रॅम चरस जप्त केला. आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. आरोपी पास्ते याला कारागृहातून तपासणी करून पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात नेण्यात आले. त्याच ठिकाणी त्याला कुणीतरी चरस दिल्याचा संशय आहे. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तात असताना त्याला चरस उपलब्ध झाल्याने गार्ड पोलीस पुन्हा संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed