• Mon. Nov 25th, 2024

    रुग्णाला घेऊन जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक दुचाकीला धडक, २ मावस भावांनी जीव गमावला

    रुग्णाला घेऊन जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक दुचाकीला धडक,  २ मावस भावांनी जीव गमावला

    जळगाव: जळगावातील जामनेर तालुक्यात फत्तेपूर गावाजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावसभाऊ ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दुचाकीचे अक्षरश: तुकडे झाले तर कारच्या सुद्धा समोरील भाग चक्काचूर झाला होता. जामनेर तालुक्यात फत्तेपूर-लोणी रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक सुध्दा गंभीर जखमी झाला आहे. सौरव कैलास कोळी (वय २२, रा. कोडोली) आणि शुभम दिनकर जाधव (वय २८, रा. शेंगोळा, ता. जामनेर) अशी मयत दोघा तरुणांची नावे आहेत.

    जामनेर तालुक्यातील फत्तेपूरहून एमएच १९ ईए २७७९ या क्रमाकांची कार जळगावला वृद्ध रुग्णाला घेऊन निघाली होती. कारमध्ये वृद्ध महिला, पुरुष, त्यांचा नातू आणि सून होते. कार लोणी गावाजवळ आली असताना विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी कारवर धडकली, अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील सौरव कैलास कोळी हा जागेवरच ठार झाला तर, तर दुचाकीवरील त्याचा मावस भाऊ शुभम दिनकर जाधव हा गंभीर जखमी झाला. त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार झाल्यावर खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत शुभमची प्राणज्योत मालवली.

    आजनंतर मी कुठलीही चूक करणार नाही, हातावर इतकं लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं
    या अपघातात रुग्णाला घेवून जाणाऱ्या कारवरील चालक मंगेश संतोष कोळी (वय २०, रा. फत्तेपूर) हादेखील गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला, कमरेला व डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील गावांमधील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपघात एवढा भीषण होता, या अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले असून कारचाही समोरील भाग चक्काचूर झाला आहे, अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याच भयंकर दृश्य यावेळी पाहायला मिळालं. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

    Buxar Train Accident : रेल्वे रुळावरुन ८ डबे घसरले, ४ जणांचा मृत्यू, १०० जखमी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed