पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला आहे. या फुटीनंतर पहिल्या मोठ्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका अर्थात लोकसभा निवडणुकीत मतविभाजनामुळे दोन्ही गटांना मोठा फटका बसणार असल्याचं चित्र आहे. त्यातच आता भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघ टार्गेट करण्यात येत आहे. अमेठीनंतर बारामती मतदारसंघ जिंकण्याचा मनसुबा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा खासदार बनविण्यासाठी शरद पवार यांचा गट कामाला लागला आहे.
आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात ठेवण्यावर सविस्तर चर्चा झाली. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठक पार पडली. यामध्ये भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ टार्गेट केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या मतदार संघावर आपली पकड आणखी मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. आज झालेल्या बैठकीत बुथ बांधणीसाठी कामाला लागा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर, सुप्रिया सुळेंनी मतदारसंघात मोठं काम केलं आहे, त्या सहज निवडून येतील असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. बारामतीची लढाई ही बारामती विरुद्ध महाराष्ट्र किंवा भाजपा अशी नाही, तर बारामती विरुद्ध दिल्ली अशी असल्याचं देखील शरद पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या बैठकीनंतर सुप्रियाताईंसाठी जोमाने काम करणार असल्याचा शब्द पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना दिला आहे.ॉ

दुसरीकडे, शरद पवार यांच्यासोबत असणारे बारामतीमधील काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करण्याचं टाळलं जावं. त्यांच्यावर केलेल्या टीकेमुळे काही लोकांमध्ये नाराजी पसरते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. मात्र या कार्यकर्त्यांना बैठकीतच वरिष्ठ नेत्यांकडून समज देण्यात आली. ‘जर टीका केली नाही तर आपण सोबत आहोत हा मेसेज बाहेर जाईल त्यामुळे टिकेला उत्तर दिलेच पाहिजे’ असं वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या लढाईचा पुढचा अंक आता बारामतीत पाहायला मिळणार हे नक्की.