या उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील महिलांना रेल्वे प्रवाशांचे मुंबई रेल्वे पोलिसांच्या महिला अंमलदार यांचे समवेत मुक्त आणि सुरक्षित अभिवचन प्रस्थापित व्हावे यासाठी कोटो महिला सुरक्षा समुदाय, खाकीतील सखी या उपक्रमाला पाठिंबा देणार आहे. महिला प्रवासी त्यांच्या लोकल प्रवासादरम्यान येणाऱ्या कोणत्याही समस्यांची तक्रार करण्यासाठी कोटो समुदाय अॅप वापरू शकतात. ते त्यांच्या समस्यांबद्दल फोटो, व्हिडिओ आणि संदेश पोस्ट करू शकतात आणि रेल्वे पोलिस त्याप्रमाणे त्वरित कारवाई त्यांना संबोधित करतील.
या उपक्रमामागील कल्पनेवर चर्चा करताना. डॉ. रवींद्र शिसवे. पोलिस आयुक्त, रेल्वे, मुंबई म्हणाले, “कोटो सारख्या माध्यमाशी जोडून घेताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यांची महिलांचे सुरक्षेबाबतची मूल्य आमच्यासारखीच आहेत. आमच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे शहरातील महिला प्रवाशांशी मजबूत संबंध निर्माण करणे आणि लोकल ट्रेनमधून प्रवास करताना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना त्या आमचा आधार घेऊ शकतात असा आत्मविश्वास निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. हा उपक्रम म्हणजे मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेसाठी आमच्या सततच्या प्रयत्नांचा विस्तार आहे.”
कोटोच्या सह-संस्थापक अपर्णा आचरेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “कोटो महिलांना कोणताही संकोच किंवा डिजिटल ट्रोलिंगशिवाय स्वतःला व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करण्याची कल्पना करते. हा उपक्रम शहरातील महिलांमध्ये विश्वासाची भावना वाढवतो, ज्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना सुरक्षेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या त्यांनी मुंबई रेल्वे पोलिस महिला अंमलदारांना सांगाव्यात. #SakhiIn Khaki महिलांना मुंबई रेल्वे पोलिस महिला अंमलदारांना त्यांची मैत्रीण किंवा त्यांच्या खाकीतील सखी म्हणून पाहण्यासाठी प्रोत्साहित करते. हा उपक्रम महिला सुरक्षेसाठी मुंबई रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांना सामुदायिक भागीदार म्हणून एक पाऊल पुढे टाकत आहे.