काय आहे प्रकरण?
तीन महिन्यांपूर्वी घर सोडल्यानंतर आरोपी हा जामठ्याच्या जंगलात राहायचा. ४ ऑक्टोबरला सकाळी त्याने एका घरातून कुऱ्हाड चोरी केली. त्यानंतर तो परिसरातील जंगलात फिरत होता. याचवेळी त्याला विद्यार्थिनी दिसली. कुऱ्हाडीचा धाक दाखवून त्याने विद्यार्थिनीवर बलात्कार केला व पसार झाला. शनिवारी तो बेलतरोडी परिसरात आला. एक महिला जंगल परिसरात त्याला दिसली. त्याने तिची छेड काढली. स्वत:ची सुटका करून महिला घरी आली. काही वेळाने ‘जंगल बॉय’ही तिच्या घरी आला. त्याने पुन्हा तिची छेड काढली. महिलेने लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.
चौकशीदरम्यान विद्यार्थिनीवरील बलात्काराचाही उलगडा झाला. पोलिसांनी त्याला बेलतरोडीतील प्रकरणात अटक केली. ‘जंगल बॉय’विरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावेही आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येऊन १५ दिवसांच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठीही पोलिस प्रयत्न करणार असून, या बलात्कार खटल्याचा निकाल तीन महिन्यांच्या आत लागावा, अशी तयारी पोलिसांनी चालविली असल्याची माहिती आहे.
महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्याने पाच लाखांचे बक्षीस असलेला नराधम सापडला. नंतर बेलतरोडी पोलिसांनी त्याला अटक केली. हे पाच लाखांचे बक्षीस कोणाला मिळणार, याबाबत पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे. महिलेला न मिळाल्यास बेलतरोडी पोलिसांना हे बक्षीस मिळेल. नंतर या बक्षिसाची रक्कम पोलिस कल्याण निधीत जमा होईल, अशीही माहिती आहे.