• Mon. Nov 25th, 2024

    एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? महामंडळाकडून मिळणार खास भेट, सरकारकडे पाठवला प्रस्ताव

    एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? महामंडळाकडून मिळणार खास भेट, सरकारकडे पाठवला प्रस्ताव

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीचे नियोजन सर्वसामान्यांकडून सुरू झाले आहे. दिवाळीनिमित्त मिळणाऱ्या बोनस आणि दिवाळी भेटीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

    महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्मचाऱ्यांना अडीच हजार आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये अशी दिवाळी भेट देण्यात येत होती. राज्यात सत्तांतर झाल्यावर एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट पाच हजार रुपये देण्याचा निर्णय परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यानुसार गेल्यावर्षी एसटीतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये दिवाळी भेट जमा करण्यात आली होती. यंदाच्या दिवाळी भेटीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, लवकरच दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल, असा विश्वास एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    मुंबईच्या दारी टोल’कोंडी’, पिवळ्या रेषेच्या पलिकडील वाहनांकडूनही जोरात वसुली, ५ मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास वाया

    १५ हजारांची मागणी

    एसटी महामंडळाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. एसटीच्या ७५ वर्षांच्या प्रवासी सेवेत कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग आहे. मुंबई महापालिका, बेस्ट, विद्युत महामंडळ, रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मोठी रक्कम दिली जाते. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये अशी भेट मिळावी, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *