नवीन अतिरिक्त फूटपाथ नवरात्रीपूर्वी बांधून पूर्ण करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. ही कालमर्यादा पाळून हा सहा मीटर रुंद आणि अंदाजे ३०० मीटर लांबीचा फूटपाथ घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुला करून दिल्याबद्दल केसरकर यांनी पालिकेचे कौतुक केले.
महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांना, मंदिरात सहजरित्या पोहोचता येईल अशा उपाययोजना करून फूटपाथ तयार करण्याचे व मंदिरालगत वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना केसरकर यांनी केल्या होत्या. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना आपले वाहन सार्वजनिक वाहनतळात पार्क करून, फूटपाथचा वापर करत ते मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. पदपथाचा आपत्कालीन परिस्थितीतदेखील वापर करणे शक्य होईल, अशारीतीने बांधण्यात आला आहे.