• Mon. Nov 25th, 2024
    पिटबुल कुत्रा हल्ला प्रकरण; तरुणाचा मृत्यूशी लढा सुरूच, जखमी असिफने सांगितला तो थरारक प्रसंग

    सोलापूर: शहरातील पूर्व भागातील एका गारमेंट फॅक्टरीच्या कंपाऊंडमध्ये एका पिटबुल जातीच्या कुत्र्यांने एका मनोरुग्ण तरुणावर जबर हल्ला चढवत गंभीर जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली होती. घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी झालेला असिफ मृत्यूशी लढा देत आहे. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
    सभा ठरली अखेरची! घरी परतत असताना तरुणावर काळाचा घाला; कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न
    असिफचे नातेवाईक जबरदस्त धक्क्यात आहेत. पिटबुल कुत्र्यावर बंदी असताना देखील त्याला पाळले गेले. पोलिसांनी म्हणावी तशी सक्त कारवाई केली नाही. गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकली अशी परिस्थिती झाली आहे. कुत्र्याचा मालक आजतागायत आला नाही किंवा त्याच्यासोबत संपर्क झाला नाही. पोलीस स्टेशनला देखील हजर झाला नाही. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी देवदूतसारखी मदत केली असल्याचे माहिती असिफच्या भावाने दिली आहे. पिटबुल कुत्र्याने जवळपास शंभर ठिकाणी लचके तोडले आहे. शरीराची चाळणी केली आहे. डोक्यावर चावा घेत कवटीपर्यंत इजा केली आहे. डॉक्टरांनी अजूनतरी टाके घातले नाही. पण जवळपास एक हजार टाके पडले असते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

    असिफ मुल्लावर पिटबुल कुत्रा जीवघेणा हल्ला चढवत होता. त्यावेळी त्याचा मावस भाऊ अस्लम शेख हा जवळून जात होता. गर्दीतुन एका इसमाने अस्लमला माहिती दिली. तुझ्या भावाला कुत्रा फाडून खात आहे. त्यावेळी मी धावत गेलो. तोपर्यंत कुत्रा माझ्या भावाच्या शरीराची चाळणी करून गेला होता. मी मदतीसाठी आरडाओरडा करत आत प्रवेश केला. परंतु कोणीही मदतीला आले नाही. गर्दीतून फक्त मोबाईलमध्ये व्हिडीओ कैद केले जात होते. पिटबुल कुत्र्याने अर्धा तास असिफचे लचके तोडले. एकाही व्यक्तीने धाडस करत असिफला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले नाही, अशी अस्लम शेख याने माहिती दिली.

    बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार, निवेदन घेऊन आलेल्या लोकांची मोठी गर्दी

    यानंतर त्याने संदेश दिला आहे की, आज माझ्या भावावर संकट ओढवले होते. उद्या तुमच्यावर संकट येईल. अगोदर मदत करा. दगडाचे काळीज ठेवू नका, अशी भावनिक हाक त्याने दिली आहे. असिफ मुल्ला याचे लचके तोडताना व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असिफ हा ईश्वर गारमेंट करखान्याच्या गेट मध्ये आत गेला होता. गेटला कुलूप होते. शुक्रवारपासून प्रत्येक व्यक्तीला एकच प्रश्न पडला आहे, असिफ आतमध्ये गेला कशाला?
    कासव तस्करीचं आंतरराज्य रॅकेट, रेल्वेचा वापर, पैसे वगैरे सर्व ठरलेलं, नागपूरमध्ये असा झाला भांडाफोड
    ईश्वर गारमेंटचे व्यवस्थापक चंद्रशेखर क्षीरसागर यांनी देखील प्रतिक्रिया देताना हाच प्रश्न उपस्थित केला. जखमी असिफने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, दोन दिवसांपासून घरातून नैराश्य होऊन बाहेर पडलो होतो. रात्रीच्या सुमारास ईश्वर गारमेंट जवळ असताना पोलिसांनी हटकले होते. पोलिसांना घाबरून मी गेटमध्ये गेलो होतो. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला. जवळपास अर्धा तास माझे लचके तोडले. माझ्या अंगावरील सर्व कपडे फाडले. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझी ताकद पिटबुल कुत्र्यासमोर कमी पडली.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed