• Sat. Sep 21st, 2024

तीन महिन्यांपूर्वी पतीचे निधन,खचलेल्या पत्नीचाही टोकाचा निर्णय, आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य संपवल्याची चर्चा

तीन महिन्यांपूर्वी पतीचे निधन,खचलेल्या पत्नीचाही टोकाचा निर्णय, आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य संपवल्याची चर्चा

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या डिगडोह येथील राजगृह परिसरात राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतक महिलेचे नाव संगीता युवराज गुंडारे असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार , डिगडोह येथील मृतक महिलेच्या पती युवराज गुंडारे यांचा तीन महिन्यांपूर्वी आजाराने मृत्यू झाला होता. संगीता ही सासू आणि मुलासोबत राहत होती. तिची सासु आणि मुलगा भाजी विकायचे. दुपारी तिचा मुलगा आणि सासू भाजी विकण्यासाठी बाजारात गेले असता त्या घरी एकट्याच होत्या.
यावेळी महिलेने पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लंडन नंतर आता भारत- पाक सीमेवरही शिवरायांचा पुतळा, पुण्यातील संस्था अश्वारूढ पुतळा उभारणार, मुनगंटीवारांची माहिती
काही वेळाने शेजाऱ्यांना खिडकीतून पाहिले असता संगीता यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर ही माहिती महिलेचा मुलगा शुभम याला देण्यात आली. त्यानंतर या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

संगीता गुंडारे या एक महिला गट चालवत होत्या. अनेक महिलांनी तिच्याकडे पैसे जमा केले होते आणि त्या बदल्यात त्यांना व्याजही दिले जात होते. मात्र, अनेक महिलांच्या ठेवींवर व्याज न मिळाल्याने संगीता आर्थिक अडचणीत आल्याचे सांगण्यात येत आहे आणि यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

नवजात बाळाला वाळूच्या ढिगाऱ्यात पुरण्याचा प्रयत्न, जन्मदात्या आईचं क्रूर कृत्य

Read Latest Nagpur News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed