• Sat. Sep 21st, 2024
मुंबई-पुण्यासाठी विशेष गाड्या, आजपासून आरक्षण सुरू, पाहा टाइमटेबल…

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : दसरा, दिवाळी, छटपूजा या सणांमुळे प्रवाशांची गर्दी होत असल्याने मध्य रेल्वेने नागपूरवरून मुंबई तसेच पुणे मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे….

०२१३९ मुंबई (सीएसएमटी)- नागपूर ही सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात धावेल. ही गाडी उपरोक्त कालावधीत दर सोमवार आणि गुरुवारी मुंबईवरून ००.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूरला पोहचेल. ०२१४० नागपूर- मुंबई ही गाडी २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या काळात दर मंगळवार आणि शनिवारी १३.३० वाजता नगपूरवरून निघेल व दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता मुंबई येथे पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एसी थ्रीचे १६ कोच राहतील.

गुड न्यूज, पुण्यातून लातूरसह, मराठवाड्यात जाण्यासाठी विशेष गाडी सुरु होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

०२१४४ नागपूर- पुणे सुपरफास्ट ही गाडी १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या काळात दर गुरुवारी नागपूरवरून निघेल व दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुण्याला पोहचेल. ०२१४३ पुणे- नागपूर- ही गाडी २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी पुण्यावरून १६.१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता नागपूरला पोहचेल.
या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि उरळी येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एसी थ्रीचे १६ कोच राहतील.

भारत – पाकिस्तान वर्ल्डकप मॅचसाठी स्पेशल ट्रेन! मुंबई-अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट ट्रेन धावणार
या गाड्यांचे आरक्षण १४ ऑक्टोबर २०२३ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र तसेच www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed