• Sat. Sep 21st, 2024
शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत उपाययोजना करा, नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

मुंबई : सरकारी अनुदानित शाळेमध्ये, मुलींच्या मासिक पाळीच्या वेळेची शारीरिक स्वच्छता राखण्यासाठी शाळांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी स्वच्छ्ता गृहात पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. अनेक स्वच्छतागृहे खुली अवस्थेत आहेत, मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स बदलण्यासाठी देखील जागा नसल्याने सरकारी शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील अनेक अनुदानित शाळांतील मुलींच्या स्वछतागृहांची दयनीय अवस्था असल्याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले असून त्याची गंभीर दखल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सरकारी शाळेतील स्वच्छतागृहांची दुर्दशा झालेली असल्याने मुली शाळा सोडत आहेत. या बाबीचा परिणाम मुलीच्या कुटुंबाच्या मानसिकतेवर होवू शकतो. त्यामुळे सरकारी अनुदानित शाळामधील स्वच्छतागृह संदर्भात शासनस्तरावरून त्रुटी व सुविधा अभावाबाबत आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वच्छतागृहाची अवस्था सुधारणेच्या अनुषंगाने योग्य ती उपाययोजना तत्पर करणेत यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

रश्मी वहिनींसोबत जिव्हाळ्याचं नातं, आदित्य ठाकरेंना प्रेमळ सल्ला; नीलम गोऱ्हेंची भावनिक साद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed