• Mon. Nov 25th, 2024

    एक पक्ष, एक नेता… शिवाजी पार्कचा तिढा सुटताच शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर लाँच

    एक पक्ष, एक नेता… शिवाजी पार्कचा तिढा सुटताच शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर लाँच

    मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कचं म्हणजेच शिवतीर्थ हे समीकरण गेली अनेक वर्ष सुरु आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना यांच्याकडून अर्ज करण्यात आले होते. या प्रकरणी महापालिकेकडून कोणताही निर्णय घेतला जात नव्हता. मात्र, शिंदे गटाकडून अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ हे ठाकरेंना मिळणार असल्याचं स्पष्ट झालं. हा तिढा सुटताच ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीझर लाँच करण्यात आला आहे.

    एकच मैदान, शिवतीर्थ! दसरा मेळावा २०२३ , अशा कॅप्शनसह शिवसेना ठाकरे गटाकडून टीझर लाँच करण्यात आला आहे. यामध्ये एक पक्ष, एक नेता, एक विचार, एकच मैदान शिवतीर्थ, दसरा मेळावा २०२३ असा उल्लेख असलेला टीझर लाँच करण्यात आला आहे. यंदाचा दसरा मेळावा २४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यानिमित्तानं शिवसेना ठाकरे गटाकडून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे.
    पाकिस्तानच्या रिझवानला माफी तर भारतीय क्रिकेटपटूवर कारवाई, आयसीसीचा दुटप्पीपणा आला समोर…

    शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार

    गेल्यावर्षी शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर ठाकरे गटानं शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा पार पडला. यंदा देखील शिवाजी पार्क कुणाला मिळणरा याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता उद्धव ठाकरेंच्या गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचं स्पष्ट झालेलं असल्यानं उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    दसरा मेळाव्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु

    सरकारी शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत तत्काळ उपाययोजना करा; नीलम गोऱ्हे यांची शिक्षणमंत्र्यांना सूचना
    दसरा मेळाव्याच्या अगोदरच शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना भाषणाच्या माध्यमातून पुढील वर्षभरासाठी कार्यक्रम द्यायचे. उद्धव ठाकरे देखील त्यांच्या राजकारणाच्या पुढच्या दिशेचे संकेत दसरा मेळाव्यातून देत असतात. यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर पार पडणार असल्याची माहिती आहे.
    IND vs PAK सामन्यापूर्वी रोहित शर्माची चिंता अखेर मिटली, संघात झाली मॅचविनर खेळाडूची एंट्री …

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed