• Sat. Sep 21st, 2024

भूषण पाटीलच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, एका आठवड्यात ५० किलो ड्रग्स तयार व्हायचं!

भूषण पाटीलच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, एका आठवड्यात ५० किलो ड्रग्स तयार व्हायचं!

पुणे: ससून रुग्णालयात ड्रग्स तस्कर ललित पाटीलने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केल्यानंतर पुण्यात ड्रग्स तस्करी संदर्भात मोठी माहित समोर आली आहे. अमली पदार्थ पथकाने भूषण पाटीला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशी मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रग्स बनवणाऱ्या प्लांटमध्ये आठवड्याला ५० किलो ड्रग्सची निर्मिती केली जात होती आणि प्रत्येक किलो मागे १ कोटी ड्रग्स होलसेल भावात विकले जातात होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ पथकाने ११ ऑक्टोबर रोजी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलसोबत त्याच्या मित्र अभिषेक बलकवडेला अटक केल्यानंतर त्यांना पुणे सत्र न्यायालयात हाजार करण्यात आलं होतं. न्यायाधीश बिराजदार यांनी ५ दिवसाची म्हणजे १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार आज भूषण पाटील याची चौकशी पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, भूषण पाटीलचा मित्रा अभिषेक बलकवडे याला नाशिक येथे चौकशीसाठी नेहेण्यात आलं आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान भूषण पाटील म्हणाले की, डिसेंम्बर २०२२ मध्ये ड्रग्स प्लांट नाशिक येथे उभारण्यात आला होता. या प्लांटमधून आठवड्याला ५० किलो ड्रग्सची निर्मित होत असायची, त्यानुसार १ किलो मेफेड्रोन ड्रग्स १ कोटीला विकला जात होता. डिसेंबर २०२२ पासून ते आतापर्यंत १८०० किलो ड्रग्सची निर्मिती करण्यात आली असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

यामध्ये मुंबई पोलिसांच्या कारवाईत १५० किलो ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आहेत. तर ३०० किलो विकले असल्याचं अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मात्र, उर्वरीत ड्रग्स कुठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहे. या अकड्यांवरून या घटनेचं गांभीर्य किती असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकत नाही. मात्र, या प्रकरणात काही व्हीआयपी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed