• Mon. Nov 25th, 2024
    गणेश मंडळांना महावितरणचा ‘शॉक’, आश्वासन न पाळता थेट व्यावसायिक दराने पाठवले बिल

    नाशिक : गणेशोत्सवासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन महावितरणच्यावतीने देण्यात आले होते. त्यानुसार शहरातील अनेक मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घेतले. मात्र, गणेशोत्सव झाल्यानंतर या मंडळांना व्यावसायिक दराने वीजबिले पाठवून महावितरणने ‘शॉक’ दिला आहे.

    गणेश मंडळांना उत्सवकाळात सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येईल, तसेच बिल देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत सांगण्यात आले होते. परंतु, गणेश मंडळांना दहा दिवसांचे वीजबिल देण्यात आले असून, ते व्यावसायिक स्लॅबनुसार देऊन मंडळाना महावितरणने एकप्रकारे धक्का दिला आहे.

    Mumbai October Heat : मुंबईकरांसाठी ऑक्टोबर हिट तापदायक, सूर्य आग ओकणार; वाचा कसं असेल हवामान

    सांगा, बिल भरायचे कसे?

    संपूर्ण महाराष्ट्रात सण-उत्सवांमध्ये मंडळांना अल्पदरामध्ये वीज देण्याचा शासनाचा अनेक वर्षापासूनचा पायंडा आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी मंडळांना सवलतीच्या दरात पहिल्या युनिटपासून शेवटच्या युनिटपर्यंत एकाच दरामध्ये वीज देण्यात येते. परंतु, नाशिकच्या महावितरण विभागाने बिल देताना एक ते शंभर युनिट, शंभर ते तीनशे युनिट, तिनशे ते पाचशे आणि पाचशे ते १ हजार युनिट यांना वेगवेगळे दर आकारले आहेत. त्यामुळे अनेक मंडळांना १८ ते २५ हजार रुपयांच्या आसपास बिल आले आहे. अनेक मंडळांकडे तितकी शिल्लकदेखील राहिलेली नाही त्यामुळे हे बील भरायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    या बिलाबाबत गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली असून, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या चर्चेला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे चित्र यावरून समोर येत आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते, तरीही महावितरणने गणेश मंडळांची फसवणूक केली आहे. गणेश मंडळांना आलेले वीजबिल कमी करावे, अशी मागणी मंडळांकडून व्यक्त होत आहे. बिल कमी न झाल्यास गणेश मंडळांनी ते न भरण्याचा इशारा दिला आहे.

    October Heat : पालेभाज्यांचा ‘उन्हाळा’ संपेना, आवक घटल्याने सरसकट २० रुपये जुडी; जुड्यांचा आकार अन् पानेही लहानच
    पालकमंत्र्यांच्या बैठकीला सर्व अधिकारी हजर होते. तेव्हा सरसकट दराने वीज देऊ असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, महावितरणने मंडळांची फसवणूक केली आहे. हे बिल कमी न केल्यास कुणीही ते भरणार नाही.

    – गणेश बर्वे, अध्यक्ष, राजे छत्रपती सामाजिक कला क्रीडा मंडळ, जुने नाशिक

    Nagpur News : स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, जागेअभावी अशी वेळ आले की वाचून थक्क व्हाल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed