• Sat. Sep 21st, 2024
गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय; गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा, विश्व हिंदू परिषदेची मागणी

नागपूर: नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील विविध शहरांमध्ये गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा आणि त्यासाठी त्यांचे आधार कार्ड तपासले जावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. आयोजकांकडे त्यासाठी मनुष्यबळ नसेल तर ते विश्व हिंदू परिषद त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देतील. गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. ते केवळ नृत्य नाही किंवा एक कार्यक्रमही नाही. त्यामुळे ज्यांची देवीवर श्रद्धा आणि भक्ती नाही अशा लोकांनी गरबा आयोजित केलेल्या ठिकाणी जाऊ नये. तेथे हिंदूंनीच प्रवेश करावा, असे विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी सांगितले.
वारशाचा दावा करणाऱ्यांनी आधी आरसा पहावा, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
याबाबत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गरब्यात इतर धर्मीय ज्यांना देवीची आस्था नाही ते तिथे घुसतात आणि स्त्रियांचा विनयभंग करतात. यानंतर “लव्ह जिहादसारख्या” समस्या समोर येतात. त्यामुळे गरब्याचे आयोजन करणाऱ्या मंडळांनी अगोदरच खबरदारी घ्यावी, असे गोविंद शेंडे यांनी सांगितले. एवढेच नाही तर गरबा महोत्सवाच्या आयोजकांना मंडळांशी संपर्क साधून तशी व्यवस्था करावी, असे विहिंपने सांगितले आहे. गरबा उत्सवाला येणाऱ्या लोकांचे आधार कार्ड तपासण्यासाठी आयोजक संस्थांकडे कार्यकर्ते नसल्यास विहिंप आपले कार्यकर्ते नसेल तर विहिंप आपले कार्यकर्ते उपलब्ध करून देईल.

स्पेशल केक अन् मनसैनिकांची गर्दी; वसंत मोरेंच्या वाढदिवसाला अमित ठाकरेंची उपस्थिती

गरबा उत्सवात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. गरबा कार्यक्रमात इतर धर्माचे लोक सहभागी होतात आणि त्यामुळे लव्ह जिहादच्या घटना घडत असल्याचा आरोप हिंदू संघटना करत आहेत.राज्याच्या विविध भागांतील विश्व हिंदू परिषद शाखांनी गरबा उत्सव आयोजित करणाऱ्या संघटनांशी संपर्क साधून केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्याची विनंती केली आहे. गरबा उत्सवासाठी येणाऱ्यांचे आधार कार्ड पडताळणी आणि प्रवेश शुल्काची व्यवस्था करण्यासाठी मंडळांकडे कार्यकर्ते नसल्यास, विहिंप आपले कार्यकर्ते देईल. असेही गोविंद शेंडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed