• Sat. Sep 21st, 2024
बारावीच्या विद्यार्थिनीवर रोजंदारीने मुलांना शिकवण्याची जबाबदारी; जि.प. शाळेतील मास्तराचा कारनामा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या चरविदंड येथे जिल्हा परिषद व्यवस्थापनाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. यामध्ये एकूण १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळेतील शिक्षक सुशील आडीकने हे शाळेवर येत नसून त्यांनी अध्यापनाची जबाबदारी गावातीलच एका बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनीवर सोपविल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे.

आदिवासी बहुल असलेल्या चरविदंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सुशील आडीकने यांनी चरविदंड येथील एका बारावीचे शिक्षण झालेल्या तरुणीला १,५०० रुपये महिन्याप्रमाणे अध्यापन कार्यासाठी ठेवले आहे. शिक्षकानेच एका बोगस शिक्षकाची नियुक्ती या शाळेत केली असल्याचे दिसून येते. यामुळे एकच खळबळ माजली आहे. यावेळी पालकांची चर्चा केली असता सदर शिक्षक हे आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच शाळेत येतात अथवा येत सुद्धा नाहीत. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

मोठी बातमी: शुभमन गिलला हॉस्पिटलमध्ये केले दाखल, भारत-पाक सामन्यातूनही बाहेर होण्याची शक्यता
विशेष म्हणजे, अशीच घटना काही वर्षांपूर्वी कोरची तालुक्यातील बोटेझरी येथे घडली होती. ज्यामध्ये दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दोन हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे शिकवायला ठेवले होते. त्यावेळी जिल्हा परिषद गडचिरोली येथील तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांनी दोन्ही शिक्षकांना निलंबित केले होते. आता यावर काय कार्यवाही केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत प्राथमिक शिक्षण अधिकारी विवेक नाकाडे यांना विचारणा केली असता सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

शरद पवारांचा फोटो लावणार नाही, अजितदादा गटाची घोषणा, माजी मुख्यमंत्र्यांचं छायाचित्र बॅनरवर लावणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed