• Tue. Nov 26th, 2024

    World Mental Health Day: घरातील ज्येष्ठांना मानसिक आजारांपासून कसं वाचवाल? जाणून घ्या एक्स्पर्टचं मत

    World Mental Health Day: घरातील ज्येष्ठांना मानसिक आजारांपासून कसं वाचवाल? जाणून घ्या एक्स्पर्टचं मत

    मुंबई : सतत येणारे आजारपण, मुलांकडून होणारा छळ, शाब्दिक अपमान, संपत्ती नावावर करून देण्यासाठी मुलांकडून येणारा दबाव, आर्थिक चणचण यांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्य, तसेच इतर मानसिक अनारोग्याच्या तक्रारी वाढत्या आहेत. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने या लक्षणांची तीव्रता वाढताना दिसत आहे.

    मागील काही वर्षांत शहरांमध्ये एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढती आहे. या ज्येष्ठ नागरिकांची मुले नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशामध्ये, तसेच इतर शहरांमध्ये आहेत. त्यांच्याशी फोनवरून वा सोशल मीडियावरून संपर्क असला, तरीही गरज असते त्यावेळी त्वरित मदत मिळत नाही. त्यामुळे एकटेपणामध्ये अधिक भर पडते, अशी खंत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने काही ज्येष्ठ नागरिकांकडे यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी एकाकीपणा, भीती आणि हिंसा या तीन कारणांमुळे त्यांचे मनोबल खचत असल्याचे मान्य केले.

    मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. अनेकदा एकट्या, तसेच नैराश्याने ग्रासलेल्या या गटातील रुग्णांना शेजारी वा इतर कुणीतरी परिचित वैद्यकीय उपचारासाठी घेऊन येतात. त्यांना योग्यवेळी उपचार मिळाले नाही, तर त्यांच्या शारीरिक दुखण्यांमध्ये वाढ होते. सतत अंग दुखणे, जगण्याची इच्छा संपून जाणे या तक्रारींमध्ये मागील काही वर्षांत वाढ झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
    मुंबईकरांनो मिटक्या मारत खाता, ते स्ट्रीट फुड स्वच्छ आहे का? FDAकडून धक्कादायक खुलासा
    या तक्रारी दिसतात
    – एकटे राहण्याची भीती
    – भटक्या कुत्र्यांची, चोरांची भीती
    – आर्थिक चणचण
    – वैद्यकीय कारणे
    – जोडीदार सोडून गेल्यामुळे आलेले नैराश्य
    – मदत मागण्यामध्ये भीती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed