• Sat. Sep 21st, 2024

पेंच व्याघ्रप्रकल्पाचा राष्ट्रीय सन्मान; ‘या’ कामांबद्दल प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार मिळाला

पेंच व्याघ्रप्रकल्पाचा राष्ट्रीय सन्मान; ‘या’ कामांबद्दल प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार मिळाला

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्र पेंच व्याघ्रप्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी केलेल्या कामांबद्दल पेंच व्याघ्रप्रकल्पाला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार मिळाला आहे. प्रत्यक्ष जंगलात संघर्षाची परिस्थिती हाताळण्यासाठी जलद प्रतिसाद देण्याच्या कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पेंच व्याघ्रप्रकल्पाने दोन भिन्न स्तरावर जलद बचाव पथकांची निर्मिती केली आहे. याशिवाय, प्रत्येक गावात ३ ते ४ तरुणांच्याही चमू तयार करण्यात आल्या आहेत. या चमूंना विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्यांना आठवड्यातून एकदा तरी गस्त घालण्याचे काम देण्यात आले. गेल्या एका वर्षात त्यांनी १७०० कि.मी. परिसरात गस्त घातली आहे.

या सर्वांची नोंदणी फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या फायर अलर्ट सिस्टीममध्ये करण्यात आली होती. त्यामुळे जंगलाला आग लागल्याची कोणतीही घटना घडल्यास प्राथमिक पातळीवर ती हाताळण्याचे काम या चमूंनी केले. यांच्यात समन्वय साधण्यासाठी समन्वयकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या या सहभागामुळे पेंच व्याघ्रप्रकल्पातील आगीच्या घटना हाताळण्यात, अचूक माहिती मिळण्यात आणि कमी वेळात प्रतिसाद देण्यात सुधारणा झाली आहे. त्यातून गावे आणि वनविभाग यांच्यातील संघर्षाच्या शक्यताही कमी झाल्या आहेत. यामुळे, पेंच प्रकल्पाला ‘वणवामुक्त पेंच’ हा कार्यक्रम यशस्वी ठरला असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पाने म्हटले आहे. प्राथमिक प्रतिसाद दलांच्या या यशस्वी कामासाठी व्याघ्र प्रकल्पाला ‘स्कॉच’ पुरस्कार देण्यात आला आहे.
नागपूरच्या रिंगरोडग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; २५ वर्षांच्या लढ्याला अखेर न्याय, मोठं काम झालं
प्राथमिक प्रतिसाद दलाचे यश
-वणव्यांच्या संख्येत घट
-वनविभागासोबत गस्त घालत असून संरक्षण कार्यात सहभाग
-शिकारीच्या आरोपींना पकडण्यात मदत
-तपासादरम्यान पंच किंवा साक्षीदार म्हणून काम करण्याची ग्रामस्थांची तयारी
-वन्यप्राण्यांवर देखरेख ठेवण्यात मदत
-जनजागृती कार्यक्रमातही ग्रामस्थांची वनविभागाला मदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed