• Sat. Sep 21st, 2024

ड्रग्ज म्हणजे नेमकं काय? कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन अधिक? लक्षणं आणि दुष्परिणाम जाणून घ्या सविस्तर

ड्रग्ज म्हणजे नेमकं काय? कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन अधिक? लक्षणं आणि दुष्परिणाम जाणून घ्या सविस्तर

नाशिक : ज्या पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीला गुंगी, सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज म्हणतात. त्यामध्ये मॉर्फिन, हेरॉइन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर यासह भांग, गांजा, चरस या स्वरूपाच्या पदार्थांचा समावेश आहे. त्यापैकी नाशिकसह राज्यात सध्या एमडी (मॅफेड्रॉन) आणि गांजाचे सेवन सर्वाधिक होत आहे.

मॅफेड्रॉन (एमडी) :

-चरस आणि गांजाची जागा आता मॅफेड्रॉन अर्थात, एमडी हा अमली पदार्थ घेत आहे. राज्यात त्याचे सेवन वाढले आहे. ‘म्याऊम्याऊ’सह इतर अनेक सांकेतिक नावांनी हे ड्रग्ज बाजारात मिळते. ही पावडर किंवा गोळ्या पांढऱ्या अथवा पिवळसर रंगात असते.
-एमडी हा ‘स्टिम्युलेटिंग’साठी तयार करण्यात आलेला अँफेटामाइन आणि कॅथिनोन स्टिम्युलेटर आहे. नैसर्गिकरीत्या तयार होणारे हे रसायन मेंदूवरील नियंत्रण प्रभावित करते. मॅफेड्रॉन हे औषध नसून, वनस्पतींसाठी बनवलेले कृत्रिम खत आहे.
-हाताच्या मनगटावर किंचितशी पावडर टाकून एका नाकपुडीतून ओढली जाते. अथवा इंजेक्शनमधून थेट नसेतही पावडर टाकून गंभीर स्वरूपाची नशा केली जाते. एमडी घेतल्याने दात कुडकुडतात.
-हेरॉइन आणि कोकेनपेक्षा मॅफेड्रॉनचे व्यसन अधिक व स्वस्त आहे. सुमारे एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत एक ग्रॅम ‘एमडी’ची विक्री होते. अशा पदार्थांची किंमत ठराविक स्वरूपात नसते.
-सन २०११ पर्यंत अमेरिका व युरोपमध्ये ‘एमडी’वर बंदी लागू झाली. भारतामध्ये सन २०१० पासून ‘एमडी’चा वापर वाढला. सन २०१५ मध्ये ‘एमडी’ला ‘नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक’ पदार्थांच्या यादीत समाविष्ट केले गेले.

कुत्ता गोली :
-काही वर्षांपूर्वी कुत्ता गोलीचे (विशिष्ट औषध) सेवन करून नशा केली जायची. पोलिस व संबंधित यंत्रणांच्या कारवाईमुळे या नशेचे प्रमाण कमी झाले.
-‘अल्प्राझोलम’ असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. ‘कुत्ता गोली’च्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो. निद्रावस्था टाळल्यास अशी व्यक्ती स्वत:वरचे नियंत्रण गमावते.

गांजा, भांग :
-‘कॅनॅबिस’ व ‘मॅरिजुन्ना’ नावाच्या झुडपाला गांजाचे झाड म्हटले जाते. त्याची फुले किंवा कळ्या हातावर रगडून एक चिकट काळा थर तयार होतो. त्याला चरस म्हटले जाते. एखाद्या खाण्याच्या किंवा पिण्याच्या पदार्थात गांजाच्या झाडाच्या वाटलेल्या पानांचा गोळा टाकला, की भांग तयार होते.
-नाशिकसह राज्यात गांजाची शेती केल्याचे प्रकार वेळोवेळी उघड झाले आहेत. त्याला अमली पदार्थविरोधी पथकाने बऱ्यापैकी प्रतिबंध केलेला आहे.
-मॅजिक मशरूम, एलसीडी, शीलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाइटनर यांचाही वापर ड्रग्ज म्हणून केला जातो.
नाशिकमध्ये आणखी नशेचा कारखाना उद्ध्वस्त; शिंदे गावात कारवाई, तब्बल ५०० कोटींचे एमडी जप्त
ड्रग्ज घेणाऱ्यांची लक्षणे

-व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होतो
-अभ्यास, खेळात, दैनंदिन कामांसह कोणत्याही गोष्टीत मन रमत नाही
-घरात इंजेक्शन, सिरींज आढळणे
-डोळे लाल व निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे
-बोलताना अडखळणे, उभे राहिल्यावर तोल जाणे
-सतत नैराश्य, तणावात असणे, भूक मंदावणे
-वजन कमी होत, बेफिकिरीची वर्तवणूक
-निद्रानाश, स्मरणशक्तीत घट, फुफ्फुस व इतर आजारांत वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed