• Sat. Sep 21st, 2024

एक कोटी गुंतवून मोठा परतावा देण्याचे आमिष, पुण्यात हॉटेलचालकाची एक कोटींना फसवणूक

एक कोटी गुंतवून मोठा परतावा देण्याचे आमिष, पुण्यात हॉटेलचालकाची एक कोटींना फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे: लष्कर भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहचालकाची गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल हेसून नईमाबादी (रा. लष्कर), शोएब मैनुद्दीन अत्तार (रा. बोपोडी), इम्रान लतीफ खान (रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मुख्तार हुसेन महंमद (वय ४४, रा. घोरपडी) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल उपाहारगृहचालक महंमद यांच्या ओळखीचा आहे. अब्दुल आणि शोएब यांनी कोंढवा भागात जमीन खरेदी करून तेथे गृहप्रकल्प बांधणार असून, त्यात एक कोटी रुपये गुंतवल्यास ७० लाख रुपये परतावा देण्याचे आमिष तक्रारदाराला दाखवले होते. आरोपींनी तक्रारदाराला जमिनीची कागदपत्रेही पाठवली. त्यानंतर तक्रारदाराने आरोपींना ९७ लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराशी संपर्क कमी केला. त्यामुळे काही काळाने तक्रारदाराने आरोपींकडे पैसे परत मागितले, तेव्हा त्यांनी ३५ लाख रुपये परत केले.

हिंगोलीत पीकविमा कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; धडा शिकवत पोलिसात गुन्हा दाखल

मात्र, उर्वरित रक्कम दिली नाही. आरोपींनी साथीदार इम्रान खानची ओळख करून दिली. इम्रान गृहप्रकल्प बांधत असून, त्याला पैसे कमी पडत आहेत. ४४ लाख रुपये गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून आरोपींनी तक्रारदाराला पुन्हा जाळ्यात ओढले. त्यानंतरही तक्रारदाराला परतावा दिला नाही. तक्रारदाराने पैसे मागितल्यावर आरोपींनी एका गुंड टोळीच्या नावाने त्यांना धमकी दिली. त्यावर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली.

रुग्णांची संख्या लक्षात घेऊन खाटा वाढवल्या पण मनुष्यबळाचे काय? ‘ससून’, ‘बीजे’मध्ये ८६९ पदे रिक्त

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed