• Mon. Nov 25th, 2024

    पक्षविरोधी सोशल मीडिया पोस्टचा धडाका, २४ तासांची नोटीसही निष्फळ, काँग्रेस नेत्याची हकालपट्टी

    पक्षविरोधी सोशल मीडिया पोस्टचा धडाका, २४ तासांची नोटीसही निष्फळ, काँग्रेस नेत्याची हकालपट्टी

    सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजन कामत यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कामत हे वारंवार सोशल मीडियावर पक्ष विरोधी वक्तव्य करून पक्षाची बदनामी करत असतात. चेतन नरोटे यांनी राजन कामत यांना नोटीस देऊन खुलासा मागविला होता. परंतु त्यांनी कोणताही खुलासा केला नाही. शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती नरोटे यांनी शनिवारी दिली. यावेळी शहर अध्यक्ष नरोटे यांनी पक्षात राहून पक्षाची व नेत्यांची बदनामी करण्याचे काम जो कुणी करेल तो कितीही मोठा नेता असला तरी त्यांच्यावर पक्ष यापुढे कारवाई करेल असा इशारा दिला.

    काँग्रेस कमिटी विविध माध्यमांतून लोकसंपर्क करत आहे

    काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे व विविध पदाधिकारी हे घर घर काँग्रेस, जनसंवाद यात्रा, विविध कार्यक्रम आदींच्या माध्यमातून सोलापूर शहरात काँग्रेस पक्षवाढीसाठी काम करत आहेत. आगामी काळात लोकसभा, महापालिका निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसकडून जनसंपर्कावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सोलापूरची जागा जिंकण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहे. तशी मोर्चेबांधणी पक्षाकडून सुरू आहे.

    राजन कामत

    Loksabha Election: भाजपचा शिंदे गटाला चुचकारण्याचा प्रयत्न, कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंसाठी सोडण्याची तयारी?

    शहर सचिव कामत पक्ष विरोधी पोस्ट टाकत होते

    सोलापूर शहर काँग्रेस सचिव राजन कामत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या विरोधात काही ना काही पोस्ट टाकत होते. याबाबत इतर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरोटे यांच्या लक्षात आणून दिली होती. राजन कामत यांच्या पोस्ट बाबत काही बाबी लक्षात आल्यानंतर नरोटे यांनी कामत यांना त्याबाबत खुलासा करण्याची नोटीस शनिवारी ( ता. २३ सप्टेंबर) दिली होती. त्यात त्यांनी २४ तासांत खुलासा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले होते. त्यानंतरही कामत यांनी रविवारपर्यंत खुलासा दिला नव्हता, त्यामुळे नरोटे यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कामत यांच्या हकालपट्टीचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर केला. राजन कामत यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती घेतली असता, त्यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली.

    Ajit Pawar: अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावेळी अजित पवारांना जाणीवपूर्वक डावललं? दादा स्पष्टच म्हणाले…

    काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचा इशारा

    काँग्रेस पक्षाची शिस्त मोडणे, पक्षाच्या अनुशासन व नियमांविरुद्ध काम केल्याच्या कारणावरून सोलापूर शहर काँग्रेसचे सचिव राजन कामत यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. कामत यांच्या माध्यमातून नरोटे यांनी पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

    वंचित फॅक्टरने काँग्रेसचा गेम केला, पण २०२४ च्या यशस्वी राजकारणासाठी आंबेडकरांना त्यांचीच गरज!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *