• Mon. Nov 25th, 2024

    जन्मदात्या आईने कोवळा जीव रस्त्यावर सोडून दिला, महिला पोलीस कर्मचाऱ्याचं मन गलबलून आलं अन्…

    जन्मदात्या आईने कोवळा जीव रस्त्यावर सोडून दिला, महिला पोलीस कर्मचाऱ्याचं मन गलबलून आलं अन्…

    नवी मुंबई: अभागी मातांकडून नकोशा झालेल्या तान्हुल्या जीवाला सोडून देण्याच्या घटना आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात. नवी मुंबईच्या घणसोली परिसरातही नुकताच असाच एक प्रकार समोर आला. घणसोलीच्या लक्ष्मी रुग्णालय आणि फिटनेस क्लबच्या बाहेर शुक्रवारी सकाळी एक बॅग आढळून आली. या बॅगमध्ये एक नुकतीच जन्माला आलेली मुलगी आढळून आली. पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर तोंडावर मास्क घातलेली एक व्यक्ती लहान मुलीला या परिसरात सोडून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. मात्र, ही व्यक्ती नेमकी कोण, याचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र, बॅगेत सापडलेल्या या कोवळ्या मुलीला दत्तक घेण्यासाठी एक महिला पोलीस कर्मचारी पुढे सरसावली आहे.

    अगं बाळाला काय खायला घातलंस? महिला म्हणाली ‘उपमा’, अन् अपहृत नवजात अर्भकाचा शोध लागला

    लक्ष्मी रुग्णालयाबाहेर या लहान मुलीला सोडून जाणाऱ्या या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. शुक्रवारी सकाळी जीममधील लोकांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर जाऊन पाहताच एका बॅगमध्ये नवजात मुलगी असल्याचे दिसून आले. या सगळ्यांनी तात्काळ कोपरखैरणे पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता लहान मुलगी जिवंत होती. त्यामुळे पोलिसांनी तिला लगेच वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर या नवजात अर्भकाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी मुलीला नेरूळ येथील विश्व बालक केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या हवाली केले.

    छापेमारीत पोलिसांनी नवजात बाळाला चिरडले, चार दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू, सहा जणांवर गुन्हा

    कोपरखैरणे पोलिसांनी याप्रकरणात मुलीची आई आणि अज्ञात मास्कधारी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या सगळ्या प्रकारानंतर नवी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल प्रीती नेहे यांनी या मुलीला दत्तक घेण्याची तयारी दर्शविली आहे. तर ज्याठिकाणी ही मुलगी सापडली तेथील जीममधील कर्मचारी सुशांत पार्टे यांनीही मुलीला दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली. मला या अनाथ मुलीला दत्तक घ्यायचे आहे. मी त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला तयार आहे, असे सुशांत पार्टे यांनी म्हटले. आता पोलीस प्रशासन कायदेशीर बाबींचा विचार करुन संबंधित मुलीला दत्तक घेण्याची परवानगी देणार का, हे पाहावे लागेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *