• Sat. Sep 21st, 2024

रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर दर्शनासाठी उसळणार विक्रमी गर्दी? हे आहे महत्त्वाचे कारण

रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर दर्शनासाठी उसळणार विक्रमी गर्दी? हे आहे महत्त्वाचे कारण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गौरी-गणपती आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर लालबाग-परळ आणि गिरगाव परिसरामध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली. शनिवारी सकाळपासूनच काही ठिकाणी गर्दी वाढली होती. तर शनिवारी सायंकाळी उशिरा या गर्दीने उच्चांक गाठला. रविवारी सकाळीही लाखोंची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यंदा गणेशोत्सवामध्ये एकच शनिवार-रविवार आल्याने या गर्दीचे प्रमाणही अधिक असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

परळ ते भायखळा परिसरात शनिवार सकाळपासून गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परिसरामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केल्याची माहिती प्रसिद्धी माध्यम संयोजक संदीप परब यांनी सांगितले. लालबाग परिसरात गणपती दर्शनासाठी आलेला भाविक चिंचपोकळी स्थानकाकडे जाताना चिंतामणीच्या दर्शनासाठी आवर्जून येतो. ही गर्दी पाहता रविवारसाठी कार्यकर्ते अधिक सतर्क झाले असून विभागीय भाविक, स्थानिक, वर्गणीदार यांनाच केवळ चरणदर्शन घेता येणार आहे. इतर भाविकांसाठी मुखदर्शनाची सोय करण्यात आल्याचेही परब यांनी सांगितले.

उजनीत २५ टक्केच पाणी, तिकडे ढगफुटीसारखा पाऊस व्हायला पाहिजे, पण नुकसान होणार नाही तिथं : अजित पवार

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शनिवारी अंदाजे सात लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले. ही संख्या रविवारी दहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शनिवारी पाच दिवसांच्या विसर्जनानंतर अनेक भाविक लालबाग-परळ परिसरामध्ये रात्री या वातावरणाचा अनुभव घ्यायला, मुखदर्शनासाठी रांगा लावतील असाही अंदाज त्यांनी वर्तवला.

गिरणगाव परिसरातमध्ये शनिवारी लाखो भाविक होते अशी माहिती तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुशांत शिंदे यांनी दिली. तेजुकाया मंडळातील गणपती दर्शनसाठी शनिवारी सात ते आठ लाख भाविक उपस्थित होते. रविवारीही हा आकडा सात ते आठ लाखांपर्यंत असेल अशी शक्यता आहे. यंदा गणेशोत्सवात एकच शनिवार, रविवार आल्याने रविवारी संध्याकाळपेक्षाही शनिवारी रात्रीची गर्दी जास्त असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed