• Mon. Nov 25th, 2024

    रेल्वेप्रवासी झाले ‘डिजिटल’ प्रेमी; ऑगस्ट महिन्यात ४३ टक्के ऑनलाइन तिकीटविक्री

    रेल्वेप्रवासी झाले ‘डिजिटल’ प्रेमी; ऑगस्ट महिन्यात ४३ टक्के ऑनलाइन तिकीटविक्री

    मुंबई : रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवरील रांग कमी करणे आणि रेल्वे प्रवाशांना सहजपणे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी डिजिटल तिकीट पर्याय प्रशासनाने खुले केले आहेत. यूटीएस मोबाईल अॅप, एटीव्हीएम आणि जेटीबीएस अशा तिकीट पर्यायाला प्रवाशांची पसंती वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेच्या ४२.६४ टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकिटांच्या माध्यमाने प्रवास पूर्ण केला आहे.

    मोबाइल अॅपमधून मुंबई लोकलचे तिकीट विकत घेण्यासाठीच्या अंतराचे निर्बंध वाढवण्यात आले आहेत. यामुळे स्थानकाच्या १० किलोमीटरच्या क्षेत्रातून यूटीएस मोबाइल अॅपमधून तिकीट खरेदी करता येते. या बदलामुळे यूटीएस तिकीट विक्रीला मोठे बळ मिळाले आहे. शहर-उपनगरांतील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या मुख्यालय, कार्यालये ५ – १० किमींच्या परिघात येतात ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांची कार्यालये, कंपन्यांमध्ये बसून तिकिटे बुक करता येऊ शकतात. यामुळे त्याचा फायदा प्रवाशांना झाला आहे. अॅपमधून पास आणि परतीच्या प्रवासाचेही तिकीट घेणे शक्य असल्याने अॅपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आहे.

    ऑगस्टमध्ये १९ टक्के तिकीटविक्री मोबाइल अॅपने झाली आहे. त्यापाठोपाठ एटीव्हीएम यंत्रणेतून झालेल्या तिकीटविक्रीचे प्रमाण १८ टक्के आहे. तिकीट खिडकीवर रांग लावून तिकीट घेणाऱ्याचे प्रमाण ५२ टक्के आहे, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    विशेष सुविधा

    -रेल्वे स्थानकातील पूर्व आणि पश्चिमेकडे तिकीट खिडकी असते. मात्र अनेक ठिकाणी पादचारी पुलावरून प्रवासी ये-जा करतात. यामुळे पादचारी पुलावर आधुनिक एटीव्हीएम ठेवण्यात आले आहे.
    -गुगलपे, फोन पे आणि अन्य यूपीआयच्या माध्यमाने पैसे भरून एटीव्हीएममधून तिकीट येते. यामुळे नव्या एटीव्हीएमला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
    भारतात अंगणवाडी केंद्रांतील ४३ लाख बालके लठ्ठ; कोणत्या राज्यात प्रमाण कमी, कुठे जास्त? जाणून घ्या
    ऑगस्टमधील रोजची तिकीटविक्री

    माध्यम – प्रवासी (लाख) – उत्पन्न (कोटी) – योगदान ( टक्के )
    यूटीएस अॅप – ६.१५ – ०.६७ -१९.३७
    एटीव्हीएम – ४.९१ – ०.६३ -१८.७९
    जेटीबीएस – १.३० – ०.१५ – ४.४८
    डिजिटल तिकीट एकूण – १२.३७ – १.४३ – ४२.६४
    तिकीट खिडकी – २७.२० – १.९७ – ५७.३६

    ऑगस्टमधील एकूण तिकीटविक्री
    माध्यम – डिजिटल आणि तिकीट खिडकी
    प्रवासी – ३९.५७ लाख
    डिजिटल तिकीट विक्री – ४२.६४ टक्के
    तिकीट खिडकीवरील विक्री – ५७.३६ टक्के
    उत्पन्न – ३.४० कोटी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *