• Mon. Nov 25th, 2024
    लग्नापासून धुमसत होती एक गोष्ट, अखेर ठिणगी पडली, सासुरवाडीत जावयाने सहा जणांवर हल्ला का चढवला?

    शिर्डी : रात्रीच्या वेळी सासुरवाडीला पोहोचून जावयाने दार वाजवलं, परंतु त्याच्या मनात काही वेगळंच होत, दार आतून उघडताच समोर दिसेल त्याच्यावर जावयाने चाकूने वार सुरू केले. पत्नीसह मेव्हणा आणि आजेसासूला संपवलं. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ सावळी विहीर येथे एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून या हत्याकांडानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना नाशिक पोलिसांच्या मदतीने नाशिकरोड येथून ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू केलाय.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादाच्या कारणातून हे हत्याकांड घडले असून शिर्डीजवळ सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली. जावई सुरेश निकम याने आपला चुलत भाऊ रोशन कैलास निकम याला सोबत घेऊन सासुरवाडी गाठली. तिथे पत्नी वर्षा, मेव्हणा रोहित आणि आजेसासू अशा तिघांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. तर या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

    मोदी सरकारच्या योजना सांगण्याचा बहाणा, भिवंडी पोलिसांचं बिहारमध्ये वेशांतर, आरोपी दिसताच धरला, कारण भयंकर
    वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तसेच चांगदेव द्रौपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

    सासूच्या टोमण्यांना सून वैतागली, पुण्यात २२ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं
    या प्रकरणी संशयित सुरेश निकम याला पोलीसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान शिर्डी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नाशिक इथून सुरेश निकम आणि रोशन निकम या दोघांना अटक केली असून घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

    पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय, ५० वर्षीय वन कर्मचाऱ्याने जीव गमावला, २७ वर्षीय भाजी विक्रेत्याला अटक
    संगमनेर शहरातील सुरेश निकम यांचा विवाह सावळीविहीर शिवारातील वर्षा हिच्याशी नऊ वर्षांपूर्वी झाला होता.. मात्र गेल्या नऊ वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये कलह होता. सुरेश व वर्षाला आज चार वर्षाची मुलगी आणि सात महिन्यांची मुलगी असे दोन बालक सुद्धा आहेत. कौटुंबिक कलहातून काल रात्री सुरेश अकरा ते बाराच्या दरम्यान सासुरवाडीला आला त्या ठिकाणी प्रवेश करताच अचानक त्याने हल्ला सुरू केल्याने गायकवाड कुटुंबीय घाबरलं.

    पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

    या हल्ल्यात मुख्य आरोपी सुरेश निकम याची पत्नी वर्षा निकम, मेव्हणा रोहित गायकवाड आणि आजे सासू हिराबाई गायकवाड या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चांगदेव गायकवाड, संगीता गायकवाड आणि योगिता जाधव हे तिघे जखमी झाले आहेत.जखमींवर साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू असून या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना जेरबंद केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed