• Sat. Sep 21st, 2024
राज्यात या जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; घरात कंबरेपर्यंत पाणी, ऐन गणेशोत्सवात कहर

चंद्रपूर : चंद्रपुरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐन सणासुदीत नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे नदीनाल्यांच्या काठी वसलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. तर तूकूम परिसरातील कार्मेल अकॅडमी शाळेच्या मागे कित्येक घरांमध्ये अचानक पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळत असून प्रशासनाच्या भोंगळ्या कारभारामुळे मोठा मनस्तापही सहन करावा लागतो आहे. खरंतर, राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस आणखी सक्रीय होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागिरकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra Weather Forecast : राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, मुंबई, पुण्यासह १४ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी
दरम्यान, राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून पुढचे काही तास महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना ढगांच्या गडगडाचा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नबरनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या ३ ते ४ तासांत जळगाव, रायगड, रत्नागिरी, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed