• Mon. Nov 25th, 2024
    गजानन महाराजांची ११३वी पुण्यतिथी, शेगावात भक्तांची मांदियाळी; ५००हून अधिक दिंड्या दाखल

    बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळखत असलेल्या शेगावचे संत श्री. गजानन महाराजांची आज ११३वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येनं भाविक शेगाव येथे दाखल झालेले आहेत. भाविकांनी शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री. संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो.

    सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषत: ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्यासुद्धा सहभागी झाल्या आहेत. शेगावात शेकडोंच्या संख्येने दिंड्या दाखल झाल्या असून पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी अश्वरथ, मेनादिंडी आदि वैभवासह संपूर्ण गावात नगर परिक्रमा करणार आहे. यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात हरी नामाच्या गजराने शहरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. श्री. संत गजानन महाराज संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभरातील उत्सवापैकी हा देखील एक मोठा उत्सव असतो.

    समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात, जनावर आडवं आल्याने कार उलटली, फेन्सिंग नव्हतं?
    श्री. संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची नगर परिक्रमा पालखी निघणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने दिंड्या देखील सहभागी होत असतात. उत्सवानिमित्त श्रींचे मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन आणि काही घटना घडू नये याची दक्षता म्हणून मंदिरात येणे व जाण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात स्त्रीचे समाधी दर्शन व्यवस्था, श्रीमुख दर्शन व्यवस्था, श्री. महाप्रसाद, श्री. महापारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था केली गेली आहे. श्री. संस्थांचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्त यांच्या देखरेख आणि मार्गदर्शनाखाली समस्त सेवाधारी आलेल्या भक्तांना सर्वतोपरी सुविधा पुरवत आहेत.

    पालख्या व मंडळांच्या मिरवणुकीचे प्रवेश मार्गात बदल….

    भक्तांची वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्री. मंदिर परिसराचे पश्चिम भागावर श्री. संस्थाद्वारा १२ मीटर रुंदीचा नवीन भव्य रस्ता विकसित करण्यात आला आहे. या रस्त्याने यापुढे सर्व उत्सव आणि विशेष प्रसंगी आणि वर्षभरात मंदिरामध्ये येणाऱ्या शेकडो दींड्या पालख्या तसेच शहरातील विविध शोभायात्रा आणि सर्व धर्मीय मंडळाचे मिरवणूक भाविक भक्तांची सुरक्षा व सुव्यवस्था लक्षात घेऊन प्रसंगी कोणतीही अनुचित व काही घटना घडू नये म्हणून या रस्त्याने जाणार आहेत.

    गर्दीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाचे विविध मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार खबरदारीचे उपाययोजना म्हणून लहुजी वस्ताद चौकमध्ये हा १२ मीटरचा रस्ता करण्यात आला आहे. रस्त्यावरील श्री. मंदिर परिसराचे पश्चिम दारातून आत येथील आणि सर्व देवी देवतांचे संत महंतांचे, ब्रह्मरुंद द्वारा पूजन करून संबंधितांचा सत्कार तसेच सहभागी भाविकांना चहापान आणि इत्यादी सोपस्कार पार पडतात.

    दिंड्या पालख्या शोभायात्रा आमि मिरवणुकी श्री. मंदिर परिसराच्या दक्षिण द्वारातून पुढे मार्गस्थ होतील. यासाठी श्री. संस्थांच्या नियोजनात सर्वांनी सहकार्य करून सहयोग प्रदान करावा, असे आवाहन श्री. गजानन महाराज संस्थानचे सेवाधारी विश्वस्त मंडळी व समस्त सेवादारी यांनी केलं आहे. मुख्य म्हणजे आज विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर उद्या २१ सप्टेंबर गुरुवार रोजी हरिभक्त परायण श्रीधर बुवा आवारे यांचे सकाळी सहा ते सात काल्याचे किर्तन आणि नंतर दहीहंडी गोपाल काला होईल आणि या उत्सवाचा समारोप होईल.

    Nashik News: गणपती मंडपात तरुणाचं व्हिडीओ शुटिंग, ATS आणि IB अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन्…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed