• Sat. Sep 21st, 2024

तरुणाची आत्महत्या,पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप; कुटुंबीयांचा ठाण्याला घेराव

तरुणाची आत्महत्या,पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप; कुटुंबीयांचा ठाण्याला घेराव

नागपूर : नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्यांत बुधवारी तरुणाचा मृतदेह घेऊन पोलिस ठाण्याला काही लोकांनी घेराव घातल्याने खळबळ उडाली आहे. पाचपावली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावामुळे या तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीय आणि नागरिकांनी केला आहे.

पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी हे या मृत तरुणाचे सासरे असल्याचे सांगण्यात येत असून, घरगुती वादामुळे हा तरुण माहेरी आलेल्या आपल्या पत्नीला परत नेण्यासाठी सासरी आला होता, जिथे मारहाणीमुळे त्याच्यावर जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या तरुणाने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीय करत होते. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण शांत झाले, त्यानंतर हे लोक मृतदेह घेऊन तेथून निघून गेले.

बुधवारी तरुणाचा मृतदेह घेऊन लोकांच्या जमावाने पाचपावली पोलीस ठाणे गाठून पोलीस ठाण्याला घेराव घातला. हा मृतदेह म्हाडा कॉलोनी येथील रहिवासी शांतनू वालदे नावाच्या तरुणाचा होता.शांतनुचा २०२१ मध्ये लष्करीबाग येथील रवि गजभिये यांच्या मुलीशी विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या चारदिवसांतच पती-पत्नीमध्ये भांडण झाले, त्यानंतर मुलगी आपल्या माहेरी निघून गेली होती.

मुलीचे वडील रवी गजभिये हे पाचपावली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. घरगुती वादातून मृतक शांतनूवर यापूर्वीच पोलिस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. १८ सप्टेंबरच्या रात्री शंतनू हा त्याच्या पत्नीला परत नेण्यासाठी लष्करीबागेतील तीच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचला होता, तिथे त्याने पुन्हा पत्नीला मारहाण करून जबरदस्तीने घरी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यातील खटला कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित असल्याचे कारण देत त्याच्या पत्नीने त्याचा सोबत येण्यास नकार दिला. यानंतर जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शंतनूला अटक केली, मात्र एका दिवसानंतर त्याला कोर्टातून जामीन मिळाला. जामीनावर घरी पोहोचल्यानंतर नैराश्यातून शांतनूने आत्महत्या केली.

पोलिसात कार्यरत असल्याने रवी गजभिये यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शांतनूवर गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पाचपावली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वैभव जाधव यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले आणि या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मृत तरुणाचे कुटुंबीय आणि नागरिक मृतदेह घेऊन तेथून निघून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed