• Mon. Nov 25th, 2024
    नवी मुंबईतील नैना परिसरातील १७१ घरांसाठी सिडकोची लॉटरी, जाणून घ्या सविस्तर माहिती

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नैना प्रकल्पाच्या मंजूर ‘डीसीपीआर’नुसार चार हजार चौ. मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २० टक्के जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांच्या सदनिकांसाठी खासगी विकासकांमार्फत नैना प्रकल्प परिसरामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर एकूण १७१ सदनिकांची गृहनिर्माण योजना सादर करण्यात आली आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ७ तर, अल्प उत्पन्न गटासाठी १६४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

    या तरतुदीनुसार संबंधित प्रकल्पाकरिता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत सदनिकांची माहिती ७ विकासकांनी सिडकोस सादर केली आहे. त्यानुषंगाने अशा सदनिकांसाठी पात्र उमेदवारांची सोडत पद्धतीने निवड करण्यासाठी सिडको सुलभकाची भूमिका साकारणार आहे. या सोडतीनंतर पात्र उमेदवारांच्या नावाची यादी संबंधित विकासकांना सिडकोतर्फे कळवण्यात येईल.

    या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येऊन अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून सोडतीसाठी पात्रता निश्चिती करण्यात येईल. इच्छुक अर्जदार lottery.cidcoindia.com या वेबसाइटला भेट देऊन या गृहनिर्माण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
    भारताचा एशियन गेम्समधला गुरुवारचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…
    या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी २१ सप्टेंबर २०२३ ते १८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सुरू राहणार आहे. कम्प्युटराइज्ड सोडतीसाठी ऑनलाइन अर्जांवरील प्रक्रिया २९ सप्टेंबर २०२३ ते १८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन शुल्कभरणा २९ सप्टेंबर २०२३ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सुरू राहील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २ नोव्हेंबर २०२३ रोजी तर अंतिम ४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गृहनिर्माण योजनेची कम्प्युटराइज्ड सोडत ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सिडको भवन येथे काढण्यात येणार आहे.
    विराट कोहलीसाठी देशापेक्षा मोठे काहीही नाही, भारत तोडणाऱ्या खलिस्तानी गायकला दिली चपराक
    सर्वसमावेशक योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिकांसाठी सोडत पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड करून ती यादी संबंधित विकासकास पाठविणे एवढीच जबाबदारी सिडकोची आहे. त्यानंतरची सर्व कार्यवाही उदा. सदनिकेची संपूर्ण रक्कम भरून घेणे, गृह कर्ज उभारणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र यशस्वी उमेदवारास देणे, अर्जदारासोबत सदनिकेचा करारनामा करणे, दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करारनाम्याची नोंदणी करणे, सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे, अर्जदारांच्या काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे, इ. बाबी संबंधित विकासकामार्फत पूर्ण केल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची सोडत पद्धतीने निवड करून त्यांची यादी संबंधित विकासकास पाठविल्यानंतर पुढील कार्यवाहीस सिडको कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.

    महिला आरक्षणाला लोकसभेची मंजुरी, विधेयकाच्या समर्थनार्थ ४५४ मतं, विरोधात किती मतं पडली जाणून घ्या?

    कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातलाच, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय : अजित पवार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed