• Sun. Sep 22nd, 2024

पडळकरांची पवार घराण्यावर शेलकी टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकराची पिल्लं आणून…

पडळकरांची पवार घराण्यावर शेलकी टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकराची पिल्लं आणून…

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सोलापुरात संताप व्यक्त केला. सोलापूर शहरातील भैय्या चौक या ठिकाणी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचं निषेध केला.डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने गोपीचंद पडळकरांचा निषेध केला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध केला जात आहे.राष्ट्रवादीचे अजित पवार हे भाजप सोबत सत्तेत आहेत,तरी देखील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे बेताल वक्तव्य करत आहेत. त्याचा तीव्र निषेध सोलापुरातील अजित पवार गटाने केला आहे.

गोपीचंद पडळकरांच्या वाहनावर दगडफेक सोलापुरात झाली होती

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात १ जून २०१२१ रोजी सायंकाळी दगडफेक करण्यात आली होती. घोंगडी बैठकीसाठी आमदार पडळकर सोलापुरात आले होते. सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी निषेध व्यक्त करताना राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी याची आठवण करुन दिली.अमित सुरवसे आणि शिरसागर नामक दोन तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपीचंद पडळकरांनी जिभेवर नियंत्रण ठेवावं अन्यथा दगडफेकीच्या घटनेची पुनरावृत्ती होईल असा इशारा दिला.

सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक तर अजित पवार पिल्लू, पडळकरांची शेलक्या शब्दात टीका, राष्ट्रवादी आक्रमक

डुकरांच्या पिल्लांचं नामकरण केलं

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचा निषेध केला.डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण केलं.माध्यमांना माहिती देताना राष्ट्रवादीचे सुहास कदम यांनी पडळकराना इशारा दिला आहे.अजित पवार हे सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत,आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे बेताल वक्तव्य करत आहेत.सुसंस्कृत पक्षातील नेत्याने किंवा आमदाराने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे असे राष्ट्रवादीने सांगितले.आमदार गोपीचंद पडळकर असेच बेताल वक्तव्य करत राहिले तर राष्ट्रवादी त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.

अजित पवारांवर टीका; ‘पडळकरांना कुत्र विचारत नाही’, म्हणत रुपाली पाटलांनी घेतला चांगलाच समाचार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed