राज्यभरात लायसन्स आणि आरसी बुकच्या स्मार्ट कार्ड प्रिटिंगचा कंत्राट नवीन कंपनीला देण्यात आले होते. कर्नाटक येथील कंपनीने राज्यात तीन ठिकाणी प्रिटिंग करण्याबाबत निर्णय घेतला होता. यासाठी औरंगाबाद आरटीओ कार्यालयात जागाही तयार करून देण्यात आली. ही जागा मिळाल्यानंतर प्रिटिंगचे काम ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात आले. लायसन्ससह आरसी बुक प्रिटिंगसाठी या कार्यालयात सर्व व्यवस्था करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे प्रिटिंग थांबले होते. ही तांत्रिक अडचण दूर करून लायसन्सची प्रिंट सुरू करण्यात आली आहे.
एक सप्टेंबरपासून आरसी बुक स्मार्ट कार्डची प्रिटिंग करण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र, डाटा उपलब्ध न झाल्यामुळे ही प्रिटिंग थांबले होते. राज्यभरात तिन्ही केंद्रांवर आरसी बुक स्मार्ट कार्डची प्रिंट थांबल्याने वाहनचालकांना त्यांची आरसी प्रिंट मिळत नव्हते. अखेर आरसी बुक स्मार्ट कार्ड प्रिंटची तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. या अंतर्गत १३ जिल्ह्यातील स्मार्ट कार्डचा ६१ हजार ८५३ लायसन्सचा डाटा देण्यात आला होता. यातील ५४ हजार ४२८ स्मार्ट कार्ड लायसन्सची प्रिटिंग पुर्ण करण्यात आली आहे. याशिवाय ‘आरसी बुकचा १६ हजार ११ कार्ड प्रिंटचा डाटा पाठविण्यात आला होता. सदर स्मार्ट कार्डची प्रिंट पूर्ण करण्यात आली आहे. सदर स्मार्ट कार्ड पोस्टाच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयांकडे पाठविण्यात आले आहेत,’ माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे.
काही तांत्रिक कारणामुळे आरसी बुकची प्रिंट थांबलेली होती. आता ही सुरू झालेली आहे. ही प्रिंट नियमित करण्याबाबत संबंधीत कंपनीला परिवहन आयुक्तांकडून सुचना देण्यात आली आहे. यामुळे आता प्रिटिंगमध्ये अडचण राहणार नाही. ही प्रिंट नियमित होणार आहे.
विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी,छत्रपती संभाजीनगर