म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी पुणे शहरात येणाऱ्या नागिरकांची संख्या मोठी असते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून तात्पुरत्या स्वरुपात २६ ठिकाणी वाहनतळ सुरू करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीपर्यंत हे वाहनतळ सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा मिळणार असून या वाहनतळांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
वाहनतळांची ठिकाणे पुढीलप्रमाणे- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ (दुचाकी, मोटार), देसाई महाविद्यालय (पोलिस वाहने), हमालवाडा, नारायण पेठ (दुचाकी, मोटार), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), स. प. महाविद्यालय (दुचाकी), नदीपात्र रस्ता (दुचाकी, मोटार), श्री शिवाजी मराठा शाळा (दुचाकी), नातूबाग मैदान, बाजीराव रस्ता (दुचाकी), पीएमपी मैदान, पूरम चौक, टिळक रस्ता (दुचाकी), पेशवे उद्यान, सारसबाग (मोटार), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), मित्रमंडळ सभागृह (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूल (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा (दुचाकी), गणेशमळा ते राजाराम पूल (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, मोटार), विमलाबाई गरवारे महाविद्यालय (दुचाकी), आबासाहेब गरवारे महाविद्यालय (दुचाकी, मोटार), संजीवन महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी, मोटार), आपटे प्रशाला (दुचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय (दुचाकी, मोटार), जैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, मोटार), मराठवाडा महाविद्यालय (दुचाकी), एसएसपीएस महाविद्यालय (दुचाकी).
दरम्यान, वाहतूक शाखेच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवात पुण्यात येणाऱ्या नागरिकांची डोकेदुखी टळणार असल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.