• Sat. Sep 21st, 2024
लोकसभा वेळेत पण महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका, विनायक राऊतांनी लॉजिक सांगितलं, म्हणाले…

सिंधुदुर्ग : आगामी काळात अयोध्येतील राम मंदिरावरून राजकारण रंगू लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप अयोध्येतील राम मंदिर कधी पूर्ण होतंय त्यांची वाट पाहत आहे.सध्या मंदिराचे काम वेगाने सुरू आहे.आतापर्यंत सुमारे ५० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले.त्यामुळे राम मंदीर कधी पूर्ण होतंय त्याची वाट भाजपमधील काही नेते वाट पाहतायत, असं विनायक राऊत यांनी म्हटलं. लोकसभेच्या निवडणुका या वेळेत होतील मात्र महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका शंभर टक्के लागणार आहेत, असं विनायक राऊत म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये मुदतपूर्व निवडणुका शंभर टक्के लागणार असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.मात्र, लोकसभेच्या निवडणुका वेळच्यावेळी होतील, असेही राऊत म्हणाले. कारण भाजप सरकारला राम मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाण्याचे धारिष्ट्य होणार नाही.म्हणून मागच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र प्रशासन चालवत आहे. इथे लोकप्रतिनिधीना स्थान नाही.मात्र लोकसभेच्या निवडणुका वेळेवर होतील. महाराष्ट्रा सहित अनेक राज्यातील विधानसभा वन नेशन वन इलेक्शन या अंतर्गत घेतल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं विनायक राऊत म्हणाले.
Pune News : गणेशोत्सवात पुण्यात येणाऱ्यांसाठी खूशखबर: पार्किंगसाठी २६ ठिकाणी वाहनतळ, वाचा संपूर्ण यादी
जर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सज्ज आहोत असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.आम्ही निवडणुकीला नेहमीच सज्ज असतो. २४ तास जनसेवेचे व्रत बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आहे.तीच जनसेवा अखंड सुरू आहे.त्यामुळे निवडणूका कधी लागू देत आम्ही सामोरे जायला तयार आहे.समोरचा उमेदवार कोण असेल त्याची चाचपणी सर्व पक्षांकडून सुरू आहे. जो मोठा पक्ष शक्तिशाली भाजपा आहे.त्यांच्या बाजूला असलेले टिलू-पिलू जे आहेत ते सुद्धा चाचपणी करत आहेत.त्यामुळे त्यांना एखादा पडेल उमेदवार मिळेल अशी आशा धरायला काहीच हरकत नाही,असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.
वर्ल्ड कपमध्ये दिसणार रजनीकांत, जय शाह यांनी दिली खास गिफ्ट, पाहा काय आहे भेटीचं कारण….
त्यामुळं आगामी काळात खरंच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार का हे मात्र पाहावं लागणार आहे. विनायक राऊत यांच्या प्रमाणेच इतर नेत्यांनी देखील अनेकदा महाराष्ट्रा मध्यावधी लागणार असल्याचे दावे केले होते.

नव्या संसद भवनातील पहिला दिवस, प्रफुल पटेलांकडून शरद पवारांसोबतचा फोटो शेअर, म्हणाले साहेबांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed