ते म्हणाले की, नारायण राणे मंत्री होऊ शकतात त्यांचा मुलगा खासदार होऊ शकतो. मग उदय सामंत मंत्री होऊ शकतात, तर मग त्यांचा भाऊ किरण सामंत खासदार का होऊ शकत नाही. त्यामुळे किरण सामंत यांना आपला पाठिंबा आहे. पण निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांचे आहेत, असे सांगून भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर बोलणे टाळले. समृद्धी महामार्गाचे काम हे तीन वर्षात होऊ शकते तर कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प बारा वर्षानंतरही पूर्ण होऊ शकत नाही, याबद्दल जाहीर नाराजी रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. कशेडी बोगदा सुरू झाल्याने कोकणवासियांना दिलासा मिळाला. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे, त्याबाबत माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी नाराजी व्यक्त केली आणि सतेत असूनही नाराजी व्यक्त करत सरकारला घरचा आहे दिला.
समृध्दी महामार्ग तीन वर्ष होऊ शकतो मग मुंबई गोवा महामार्गाचे अद्याप पूर्ण का झाले नाही याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगून सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. पण भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजवर अनेकवेळा या मार्गाची पाहणी केली. त्यामुळे ते चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना यश येऊ दे. हा महामार्ग लवकर पूर्ण होऊन दे यासाठी आपल्या शुभेच्छा असल्याचे कदम यांनी सांगितले. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलाने कागदपत्रे देण्यास विलंब लावल्यामुळे निकाल लागण्यास वेळ लागला. मात्र सारे खापर विधानसभा अध्यक्षांवरती फोडले जाते आणि हे उद्धव ठाकरे गटाचे काही जण टीका करत आहे. उद्या अशी वेळ येईल की उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज जो काही निर्णय दिला आहे, त्याची अंमलबजावणी विधानसभा अध्यक्षांनी केलीच पाहिजे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचे माजी मंत्री रामदास कदम सांगितले. विधानसभा अध्यक्ष वकील आहेत त्यांचा अभ्यास आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. राज्यातील इतर सर्व रस्ते होतात मग कोकणावर हा अन्याय का याबाबत मला दुःख होते. मुख्यमंत्री यांची मी भेट घेतली आहे. नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. महामार्गाचे काम रखडवणाऱ्या ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याने निष्कृष्ट दर्जेचे काम केले. त्या ठेकेदावरती कारवाई झाली पाहिजे. त्याला ब्लॅकलिस्ट केलेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी मीडियाच्या माध्यमातून करत आहे. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गणपतीपूर्वी एक लाईन सुरू करू असे सांगितले होते पण ती सुरू झाली का ? नाही ना ? एक लाईन सुरू होण्यास १४ वर्ष लागली आहे. मग दुसरी लाईन सुरू करायला अजुन १४ वर्ष लागणार का? असा सवाल उपस्थित करत भाजपच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.