• Sat. Sep 21st, 2024
म्हाडाचे घर घ्यायचेय? आजपासून करता येणार अर्ज, अशी असेल प्रक्रिया, वाचा सविस्तर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील गृहनिर्माण योजनेत बांधलेल्या पाच हजार ३११ घरांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी, अर्जभरणा प्रक्रिया आज, १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ‘गो लाइव्ह’ कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता आयोजित केला आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबरला म्हाडाच्या वांद्रे पूर्वेतील मुख्यालयात सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

कोकण मंडळाच्या घरांच्या सोडत प्रक्रियेत अर्जदार कुठूनही भाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्रे अपलोड करण्यासह ऑनलाइन पेमेंटसारख्या सुविधा अँड्रॉइड आणि ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे. त्यासाठी Mhada Housing Lottery System हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जदारांच्या सुविधेसाठी https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जनोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनिचित्रफिती, हेल्प फाइल या संकेतस्थळावर आहेत.

सोडत काढली, नंबर लागला, पैसे भरले पण घरच नाही?; म्हाडाचा अधिकारी गैरहजर, रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

कोकण मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीची लिंक १६ ऑक्टोबर रात्री ११.५९पर्यंत कार्यरत असणार आहे. १८ ऑक्टोबरला रात्री ११.५९पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. त्यासह १८ ऑक्टोबरला संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे हा भरणा करता येईल. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदारच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी ३ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर अर्जदारांना १ नोव्हेंबरला सायंकाळी ५पर्यंत ऑनलाइन हरकती नोंदवता य़ेतील. ७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत जाहीर केली जाईल. त्यातून अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएस, ई-मेल, ॲपवर प्राप्त होईल. तसेच त्याच दिवशी सायंकाळपासून यशस्वी अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

‘प्रधानमंत्री आवास’अंतर्गत १,०१० घरे

म्हाडाच्या कोकण मंडळ सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक हजार १० घरे, एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एक हजार ३७, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ घरे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी ६७ आणि कोंकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या दोन हजार २७८ घरे उपलब्ध आहेत. या योजनेतील शेवटचे घर विकले जाईपर्यंत नोंदणीकरण आणि अर्जभरणा प्रक्रिया सुरू राहील. अर्जदारांच्या अडचणी निराकरणासाठी ०२२- ६९४६८१०० हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढणार, मुंबई, ठाण्यासह २३ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed