नाशिक : नाशिक जेलरोड पंचक गाव परिसरातील मलनिस्सारण केंद्राजवळ ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड, या विवाहित तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली होती. मात्र, त्या व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी कसोशीने तपासकरून खून प्रकरणी पिता पुत्रास अटक केली आली आहे. प्रेमात अडसर होऊ नये म्हणून खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देत या खुनाची उकल केली असून हा खून पंचक गाव परिसरातच राहणारा कार्तिक सुनील कोटमे (वय १९) याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांच्या पत्नीचे व कार्तिक कोटमे याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमात ज्ञानेश्वर गायकवाड यांचा अडथळा येत होता. ज्ञानेश्वर गायकवाडचा काटा काढायचा म्हणून कोटमे हा त्याच्या काही मित्रासह गायकवाड याला पंचक परिसरात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ घेऊन गेला व त्याठिकाणी ज्ञानेश्वर गायकवाड याचा धारदार हत्याराने खून केला.
Maharashtra Weather Forecast : राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, मुंबई, पुण्यासह ११ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
यानंतर कार्तिक कोटमे हा त्या ठिकाणाहून पळून आला आणि दुसऱ्या दिवशी त्याने आपले वडील सुनील कोटमे यांना घडलेली या हकीकत सांगितली. मुलगा असल्याने पुत्र प्रेमापोटी सुनील कोटमे व पुत्र कार्तिक या दोघांनी पुन्हा मलनिस्सारण केंद्राजवळ जाऊन सदरचा मृतदेह दिसू नये म्हणून झाडाझुडपात लपवला. तसेच मृतदेहावर सिमेंट काँक्रेट टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गायकवाड यांची दुचाकी सुद्धा जवळच पालापाचोळा घेऊन झाकून ठेवण्यात आली.
दरम्यान, पोलिसांना हा सर्व गुन्हा कबूल केल्याचे दोघा पिता-पुत्रांनी पोलीस सांगितले आहे. या प्रकरणात मुलाला मदत करणे देखील वडिलांना महागात पडले असून पुत्र प्रेमापोटी वडील सुनील कोटमे यांनी आपला मुलगा कार्तिक अडचणीत येऊ नये म्हणून त्याला मदत केली. मित्र प्रेमापोटी मदत करणे वडिलांना चांगलेच महागात पडले असून पिता-पुत्र दोघांनाही आता जिल्ह्याची वारी करावी लागणार आहे. या दोघांनाही आज न्यायालयात उभे केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी रिक्षा तसेच दुचाकी गाडी एक मोबाईल असा सुमारे एक लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
मालवणच्या दांडी समुद्रात सापडला सोने अन् हिऱ्यापेक्षा मौल्यवान खजिना, परिसरात एकच खळबळ